शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ‘आशा’ सेविकांची प्रशासनाकडून निराशा, कोविडकाळात अपुरे मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:08 IST

केडीएमसीच्या १४ आरोग्य केंद्रांत या स्वयंसेविका कार्यरत आहेत. यासंदर्भात स्वयंसेविका गीता माने म्हणाल्या की, ‘२००५ पासून १०७ स्वयंसेविका महापालिका हद्दीत काम करीत आहेत.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील १०७ अक्रिडेट सोशल हेल्थ अ‍ॅक्टिव्हिस्ट (आशा) कोविडकाळात अपुऱ्या मानधनावर स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करत आहेत. अत्यल्प मानधन मिळत असल्याने कोविडकाळात १० हजार रुपये मानधन द्यावे, अशा मागणीचे निवेदन बुधवारी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले आहे.केडीएमसीच्या १४ आरोग्य केंद्रांत या स्वयंसेविका कार्यरत आहेत. यासंदर्भात स्वयंसेविका गीता माने म्हणाल्या की, ‘२००५ पासून १०७ स्वयंसेविका महापालिका हद्दीत काम करीत आहेत. सुरुवातीला दरमहा ५०० रुपये मानधन दिले जात होते. आता कल्याण, डोंबिवलीत महिन्याला दीड हजार इतके अत्यल्प मानधन मिळत आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या सर्वेक्षणाचे काम जीव धोक्यात घालून करूनही हातावर दीड हजार रुपये टेकवले जाणार असतील, तर उपयोग काय’, असा सवाल त्या करत आहेत.आरोग्य विमाकवचही नाही, उपचार करणार कोण ?स्वयंसेविका संगीता प्रजापती म्हणाल्या की, सर्वेक्षणादरम्यान आम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते. आरोग्य विमाकवच नाही. कोरोना झाल्यास उपचार करणार कोण, असा प्रश्न आहे.नव्याने दाखल झालेल्या काही स्वयंसेविका भीतीपोटी काम सोडून गेल्या आहेत. त्यांना सर्वेक्षण नको. त्यामुळे सर्वेक्षणाची जबाबदारी जुन्या स्वयंसेविकांवर येऊन पडते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण