शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनामुळे दहशत आम्ही माणसे नाहीत का? बँक कर्मचाऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 01:15 IST

Coronavirus: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. बँका मात्र सुरूच आहेत. आर्थिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बँका सुरू ठेवणे क्रमप्राप्त आहे.

ठाणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. आता सर्वच व्यवहार आॅनलाइन झालेले आहेत. अत्यावश्यक सेवेत कुठेही बँक कर्मचाºयांचा समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय संचारबंदीमुळे बँकांकडे ग्राहक फिरकतही नाहीत. त्यामुळे बँकाच्या मुख्य शाखावगळता इतर शाखा बंद करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक बँकांकडून करण्यात आली आहे.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. बँका मात्र सुरूच आहेत. आर्थिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बँका सुरू ठेवणे क्रमप्राप्त आहे. मात्र २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाउन झाल्यानंतर आता बँका तरी का सुरूठेवायच्या, असा सवाल बँक कर्मचाºयांमधून उपस्थित होत आहे. अत्यावश्यक सेवा देणाºया सर्वांचेच कौतुक झाले. मात्र बँक कर्मचाºयांचा साधा उल्लेख कोणत्याही नेत्याने अथवा मंत्र्यांने केलेला नाही. असे असले तरी आजही बँका सुरूआहेत. परंतु संचारबंदी लागू झाल्याने बँकेत ग्राहक येताना दिसत नाही. ग्राहकांची संख्या पूर्णत: रोडावली आहे. बँकेत काम करणारे अनेक कर्मचारी लांबून येतात. मात्र रेल्वे सेवा बंद असल्याने अनेक कर्मचाºयांना कामावर येणे शक्य होत नाही. परंतु आता कामावर न गेल्यामुळे आमचा पगार तर कापला जाणार नाही ना, अशी शंकाही अनेक कर्मचाºयांच्या मनात येत आहे. आम्ही पण माणसे आहोत, आमचाही कुठेतरी विचार व्हावा, अशी मागणी कर्मचाºयांकडून केली जात आहे. त्यातही आता अर्थमंत्र्यांनी पुढील तीन महिने बँकेचे हप्तेदेखील घेऊ नका, असे सांगितले आहे. त्यामुळे बँकेत ग्राहक येतील असे कुठेही दिसत नाही. दुसरीकडे संचारबंदी असल्याने पोलीस रस्त्यावर येणाºया प्रत्येकाला मार देत आहेत. काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये एका बँकेत परदेशातून आलेली एक व्यक्ती पासबुकची एन्ट्री करायला गेली होती. ती कोरोना पॉझिटिव्ह होती. त्यामुळे बँकेतील इतर कर्मचाºयांचीदेखील तपासणी करण्यात आली. त्यानंतर ही बँक १० दिवस बंद ठेवण्यात आली होती.आधुनिक युगात बहुतांश व्यवहार हे आॅनलाइन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे अशा भीषण परिस्थितीत बँक सुरू असणे अपेक्षित नाही. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर आमच्या मागणीचा विचार व्हावा, अशी मागणी बँक कर्मचाºयांनी केली आहे. बँक बंद ठेवण्याची मागणी जरी आमची असली तरी एटीएममध्ये पैसे पुरविण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत. आठवड्यातील दोन दिवस त्या पद्धतीचे नियोजन करण्याची तयारीदेखील अनेक कर्मचाºयांनी दाखविली आहे. आपल्या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.यासंदर्भात मी अर्थमंत्र्यांशी मेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेही पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्यापही त्यावर योग्य ती कार्यवाही झालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँक कर्मचाºयांनाही या आजाराचा धोका आहे. त्यामुळे आमच्या मागणीचग विचार व्हावा, हीच इच्छा आहे.- राजेश मतकरी,युनियन बँकेचे पदाधिकारी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbankबँक