शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: भाज्यांची आवक थांबल्याने अ‍ॅपल मंडईची झाली कोंडी; ग्राहकही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 17:31 IST

भाज्यांचे दर दिवसागणिक बदलत असल्याने ग्राहक देखील तुलनात्मक विचार करतात. पण तरीही ग्राहकांमध्ये समाधान असल्याने काही दिवसांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा विक्रीला जोर येईल असा विश्वास युवा भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केला

डोंबिवली: एपीएमसीत भाज्यांची आवक बंद झाल्याने अ‍ॅपल मंडईमध्ये भाज्या येणे कमी झाले आहे, त्यामुळे त्याद्वारे ऑनलाईन भाज्या मागवणा-या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्याचा फटका थेट भाजी विक्रेत्यांना बसला आहे.

त्यामुळे अल्पावधीतच हा व्यवसाय चर्चेत आला असला तरी भाज्याच नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत असल्याची खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली. पहाटे पासून भाज्यांचा ट्रक येणार असेल तर कल्याण, बदलापूर मार्गावर तसेच अन्यत्र ताटकळत बसावे लागते. त्यात आता दुपारपर्यंतच भाजीचा व्यवसाय करण्यास परवानगी असल्याने अ‍ॅपवर जरी मागणी आली तरीही घरपोच सेवा देतांना अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले. अ‍ॅपल मंडई ही संकल्पना नागरिकांना आवडली, सोयीची वाटल्याने सुरुवातीला गेल्या आठवड्यापर्यंत दिवसाला ७० ते ९० ऑर्डर यायच्या पण आता काही दिवसांपासून अवघ्या २०, २५ ऑर्डर येत असल्याने नियोजन करतांना गोंधळ उडत आहे.

त्यात भाज्यांचे दर दिवसागणिक बदलत असल्याने ग्राहक देखील तुलनात्मक विचार करतात. पण तरीही ग्राहकांमध्ये समाधान असल्याने काही दिवसांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा विक्रीला जोर येईल असा विश्वास युवा भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केला.  महापालिकेकडून सहकार्य मिळाले असले तरी सुरक्षा यंत्रणेला मात्र अ‍ॅपल मंडई बाबत सांगतांना काही अडचणी येत आहेत. त्यात काही मंडळींना पोलीसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेकडून आता वाहनांना अ‍ॅपल मंडई संदर्भात ओळख लावण्यास सांगितल्याने भाज्यांची ने आण करतांना काहीसा त्रास कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. लवकरात लवकर भाज्यांची आवक सुरु होणे गरजेचे असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा युवा व्यावसायिकांनी व्यक्त केली.