शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे गृहनिर्माण संस्थांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 14:02 IST

संस्थेतील सभासद जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी टाळण्याची जबाबदारी सोपविण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील प्रमाणे जबाबदारी पार पाडण्यासाठीचे आदेश देण्यात येत आहेत.  

ठाणे :  कोरोनाच्या निर्मूलनासाठी शासनाने 14 एप्रिलपर्यंत लॉगडाऊन घोषित केले असून, कलम 144 लागू करून संचारबंदी जाहीर केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनतेने घराबाहेर न पडणे, गर्दी निर्माण करणाऱ्या घटना टाळाव्यात याबाबत दक्षता घेणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र भाजीपाला, किराणा इ. खरेदीसाठी दुकानात गर्दी निर्माण होत आहे. यातून विषाणूला प्रतिबंध होणे शक्य नाही. तरी सदरचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर यांच्या संस्थेतील सभासद जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी टाळण्याची जबाबदारी सोपविण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील प्रमाणे जबाबदारी पार पाडण्यासाठीचे आदेश देण्यात येत आहेत.  संस्थेच्या गेट जवळ सॅनिटायझरर्स ठेवून प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करूनच सोसायटीमध्ये प्रवेश द्यावा. इंटरकॉमव्दारे प्रत्येक सदस्यास आवश्यक असणाऱ्या किराणा, भाजीपाला इ. गोष्टीची मागणी गोळा करावी व त्यानुसार जवळच्या किराणा, भाजीपाला वगैरे जीवनावश्यक वस्तूची ऑर्डर ( सदस्य निहाय) देऊन सामान सोसायटीच्या गेटवरतीच मागवून घेणे.  एकेका सदस्याच्या घरी सिक्युरिटीमार्फत सदरचे सामान पोहोचवावे वा प्रत्येक घरातील 1 सदस्यास बोलवून गेटवरती सदर सामानाचे वाटप करावे, मात्र हे करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोसायटीतील सदस्य तातडीच्या न टाळता येणाऱ्या कारणाशिवाय बाहेर जाणार नाहीत याची दक्षता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जातीने घ्यावी. तसेच सोसायटीच्या क्लब हाऊस, बगीचा येथे सदस्य वा लहान मुले एकत्र येणार नाही याबाबत योग्य ती दक्षता वा प्रतिबंधात्मक उपाय योजावेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस