शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: अंबरनाथचा मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न; रुग्णवाहिकांची संख्या वाढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 23:53 IST

कोरोना रुग्णाची प्रकृती बिघडल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात पाठवावे लागत आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात ५२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णाच्या संख्येपैकी २.६९ टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे. हा दर कमी करून एक टक्क्यांवर आणण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. मृतांपैकी काही रुग्ण हे चाचणी अहवाल येण्याआधीच मरण पावले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी या भागाला भेट देऊन आढावा घेतल्यानंतर प्रशासनाची कानउघाडणी केल्यामुळे प्रशासन सक्रिय झाले आहे.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या २ हजाराच्या घरात आहे. सोबत मृत्युचे प्रमाण वाढत आहे. हा मृत्यु दर कमी करण्यासाठी प्रशासन काम करीत आहेत. वयस्कर रुग्णामध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना लागलीच उपचार देण्याची यंत्रणा तयार करण्यात येत आहे. उपचारविना मृत्यू होऊ नये यासाठी प्रशासनाने संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी छाया रुग्णालयात आॅक्सिजन वार्ड तयार करायला घेतले आहे. याच ठिकाणी अत्यंत गंभीर रुग्णांवर देखील उपचार करण्याची यंत्रणा तयार केली जात आहे. टेस्ट रिपोर्ट आल्यावर त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे.

कोरोना रुग्णाची प्रकृती बिघडल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात पाठवावे लागत आहे. मात्र आता पालिका स्वत: ४ वॉर्ड तयार करण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यामुळे मृत्युचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे. ज्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे त्यांच्यासाठी पोर्टेबल ऑक्सिजन व्हॅन तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जलद गतीने रुग्णाची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका वाढविण्यात येणार आहेत. नागरिकांची तपासणी करण्याचे काम देण्यात आले आहे.रुग्णांचे प्राण वाचावे, यासाठी जे करणे शक्य आहे ते काम करण्यात येईल. स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तसेच जलद गतीने तपासणी यंत्रणा तयार केली आहे. - डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथअनेक रुग्ण उपचार मिळत नसल्याने दगावत आहेत, हे लक्षात येताच संशयित रुग्णांसाठी उपचार यंत्रणा छाया रुग्णालयात तयार केली आहे. त्याचा लाभ रुग्णांना होईल. - जगतसिंग गिरासे, प्रशासक, अंबरनाथ पालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथ