शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात ८५७ रुग्णांची नोंद; ३२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 02:50 IST

एकूण बाधितांची संख्या १९ हजार ५२० तर, मृतांची संख्या ६५७

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ८५७ रुग्णांची तर ३२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण बाधितांची संख्या १९ हजार ५२० तर, मृतांची संख्या ६५७ झाली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २३६ रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या ३ हजार १५ तर, मृतांची संख्या ६९ इतकी झाली आहे. त्या पाठोपाठ ठाणे पालिका क्षेत्रात १८७ बाधितांची तर, दहा जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ५ हजार ९५६ तर, मृतांची संख्या १९२ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत १२४ रुग्णांची तर, नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ४ हजार ५१५ तर, मृतांची संख्या १४७ वर पोहचली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात ६७ बाधितांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ७९४ तर, मृतांची संख्या ६४ वर पोहचली. मीरा भार्इंदरमध्ये ६६ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या २ हजार १६ तर, मृतांची संख्या ९९ इतकी झाली आहे. उल्हासनगरमध्ये ४६ रुग्णांची तर, एकाचा मृत्यू झाला. बाधितांची संख्या ९५० तर, मृतांची संख्या २९ झाली आहे. अंबरनाथमध्ये ७४ रुग्णांची तर, एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ९८९ तर, मृतांची संख्या २३ झाली आहे. बदलापूरमध्ये २७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या ५०१ झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात ३० रुग्णांच्या नोंदीमुळे बाधितांची संख्या ७८४ वर गेली आहे.वसई-विरारमध्ये ९३ नवीन रुग्ण, दोघांचा मृत्यूवसई-विरार शहरात शुक्रवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर दिवसभरात ९३रुग्ण आढळले. एकूण कोरोनाबाधितांची संख्या १,९३८ वर पोहचली आहे. तर २० रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,०९४ झाली आहे. तर आजवर ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ७७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या