शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील ३१५ कोटींच्या विकासकामांना लागणार कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 01:52 IST

कोरोनाशी दोन हात करताना विकासकामे विसरा । जेमतेम १५५ कोटी रुपये मिळणार

सुरेश लोखंडे  

ठाणे : कोरोनामुळे जिल्ह्याच्या ४७० कोटींच्या विकास आराखड्यापैकी ३१५ कोटी विकास निधीत कपात करण्यात आली आहे. ही कपात ६७ टक्के इतकी असून एकूण मंजूर निधीपैकी केवळ ३३ टक्के म्हणजे १५५ कोटी रुपयेच यंदा विकासकामांवर खर्च होणार आहेत.उपलब्ध निधीपैकी १५ कोटी ४७ लाख रुपये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अलीकडेच प्राप्त झाले आहेत. उर्वरित अवघे १४० कोटी रुपये ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यातील विकासकामांवर खर्च करण्यास उपलब्ध होणार आहेत.

यंदा जिल्ह्याचा विकास आराखडा ४७० कोटी रुपयांचा होता. पण, कोरोनाच्या महामारीने तो पुरता कोलमडला आहे.राज्य शासनाने विकास आराखड्यातील मंजूर रकमेत ६७ टक्के कपात जाहीर केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासह विकासकामांची जुनी रखडलेली देणी देण्यात उपलब्ध रक्कम खर्च होणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

२०२०-२१ या आर्थिक वर्षात कपातीनंतर उपलब्ध होणाऱ्या १५५ कोटी रुपयांतून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तब्बल ९८ कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे. यंदा जिल्ह्यातील सर्वसाधारण विभागाच्या विकासकामांसाठी ३९५ कोटी तर आदिवासी उपयोजनांसाठी ७५ कोटी खर्च करण्याचे नियोजित करण्यात आले होते. पण, आता कपातीमुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, ग्रामपंचायतींच्या जनसुविधांची कामे, मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा, विशेष अनुदान, ऊर्जाविकास, जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण आणि साकवांची बांधकामे आदी कामे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांचे बांधकाम, आरोग्य विभागाचे बांधकाम, औषध सामग्री खरेदी अशा विविध कामांवर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे विकासाला खीळ बसणार आहे.भिवंडी, उल्हासनगर महापालिकांना दिला निधीजिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या १० टक्के निधीतून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास प्राधान्य दिले आहे. त्यातून भिवंडी-निजामपूर महापालिकेस एक कोटी २५ लाख तर, उल्हासनगर महापालिकेस एक कोटी ३० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयास १३ कोटी देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या