शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर, मुरबाडच्या शेतकऱ्यांना २२० क्विंटल भात बियाणे मोफत, कृषी विभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 01:43 IST

शहापूर, मुरबाड तालुक्यातील शेतकºयांच्या ४५० हेक्टरवर १८० आणि आदिवासींच्या १०० हेक्टरवरील भातलागवडीसाठी ४० क्विं टल बियाणे मोफत देण्यात येईल.

- सुरेश लोखंडेठाणे : कोरोनाच्या या संकटात शेतकऱ्यांचे ही कंबरडे मोडल्याने उपाययोजना म्हणून त्यांना सावरण्यासाठी कृषी विभाग यंदाच्या खरीप हंगामासाठी ५५० हेक्टरवर भातलागवडीचे प्रात्यक्षिके घेणार आहे. यासाठी शहापूर व मुरबाड तालुक्यातील इतर शेतºयांना १८० क्विं टल व आदिवासी वनपट्टेधारकांºयांना ४० क्विं टल भातबियाणे या आठवड्यात मोफत वाटणार आहे, असे जिल्हा कृषी अधिक्षक अंकुश माने यांनी लोकमतला सांगितले.यात शहापूर, मुरबाड तालुक्यातील शेतकºयांच्या ४५० हेक्टरवर १८० आणि आदिवासींच्या १०० हेक्टरवरील भातलागवडीसाठी ४० क्विं टल बियाणे मोफत देण्यात येईल. या प्रमाणेच दोन हजार ३५० हेक्टरच्या बांधांवर तूर पेरण्यासाठी २० क्विं टल तूर आणि नाचणीचे तीन क्विटंल बियाण १०० हेक्टरसाठी मोफत दिले जाणार आहे. दोन्ही तालुक्यात प्रत्येकी ५० हेक्टर नवपट्टेच्या शेतीवर भाताची प्रात्यक्षिक लागवड केली जाणार आहे. त्यासाठी या प्रत्येक तालुक्यातील वनपट्टेधारकांना तब्बल २० क्विं टल भात बियाणे मोफत वाटप करण्याचे नियोजन यंदा केले आहे.यंदा या आदिवासी शेतकºयांवर वर्गणी व देणगीतून मिळणाºया रकमेतून बी बियाणे खरेदीचा प्रसंग ओढावला होता. यानुसार देणगी व वर्गणीच्या स्वरूपात ७० हजारांची पुंजी जमा झाली आहे.परंतु, कृषी विभागाने त्यांना मोफत बियाणे देण्याचा निर्णय घेतल्याचे लोकमतने श्रमिक मुक्ती संघटनेच्या सल्लागार अ‍ॅड. र्इंदवी तुळपुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर त्यांनी जिल्हा कृषी अधिक्षक अंकूश माने यांचे आभार मानले. शासनाकडून मिळणारे भात बियाण्यांचे वाण कर्जत ३, कर्जत ७, रत्नागिरी आर. आर. ५, आर. आर. या भात वाणाच्या लागवडीसाठी बरोबर जमा झालेल्या रकमेतून शेतकºयांच्या पसंतीचे अन्य बियाणे खरेदी करणे आता शक्य झाल्याचे तुळपुळे यांनी सांगितले.गरव्या, हळव्या बियाणांची खरेदी शक्यएका एकरसाठी तब्बल १० किलो भाताचे बियाणे लागवडीसाठी लागते. शेतीच्या पोतनुसार शेतकरी एकावेळी वेगवेगळ्या वाणांची लागवड करून उत्पन्न घेतो. देणगीदारांकडून जमा झालेल्या व या पुढे जमा होणाºया रकमेतून जादा उत्पन्न देणाºया गरव्या, हळव्या भात बियाण्यांची खरेदी आता शेतकºयांच्या पसंतीनुसार करता येणार असल्याचे तुळपुळे म्हणाल्या.

टॅग्स :shahapurशहापूरthaneठाणे