शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मीरा भाईंदरमध्ये एक्सप्रेस इन हॉटेलमधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; पालिकेकडून हॉटेल सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 11:58 IST

coronavirus: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आता मीरा-भाईंदर महापालिकेने कारवाईला सुरवात केली असून वरसावे नाका , घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन हे मोठे हॉटेल कोरोना रुग्ण आढळून आल्याने पालिकेने सील केले आहे .

मीरारोड - कोरोनाच्या वाढत्या रुग्णां मुळे आता मीरा भाईंदर महापालिकेने कारवाईला सुरवात केली असून वरसावे नाका , घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन हे मोठे हॉटेल कोरोना रुग्ण आढळून आल्याने पालिकेने सील केले आहे . सदर हॉटेल मधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या असंख्य ग्राहकांचा शोध घेणे अवघड होणार आहे .मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण मध्यंतरीच्या काळात कमी झाल्या नंतर महापालिका व पोलीस प्रशासना कडून सुद्धा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे बंद झाले . दुसरीकडे बेशिस्त नागरिकांसह अनेक नगरसेवक , राजकारणी देखील सर्रास नियमांचे उल्लंघन करत विना मास्क वावरत आहेत . त्यातूनच पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे .त्यातच नेहमी गर्दी असणाऱ्या वरसावे नाका , घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन ह्या बड्या हॉटेलातील २१ कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळून आले . त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालिकेचे प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी १८ फेब्रुवारी पासून ४ मार्च पर्यंत हॉटेल इमारतच सील केली आहे . तसे आदेश त्यांनी सदर हॉटेलच्या दर्शनी भागात लावले आहेत .ह्या घटनेने खळबळ उडाली असून सदर हॉटेलात रोज येणाऱ्या असंख्य ग्राहकां शोधणे अवघड झाले आहे . कारण कोरोनाग्रस्त हॉटेल कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे . शासनाचे हॉटेल व कर्मचाऱ्यांसाठी दिलेले निर्देश स्पष्ट असले तरी त्याचे काटेकोर पालन केले जात नाहीत . खाण्या - पिण्या साठी आलेल्या लोकांना मास्क काढून ठेवण्या शिवाय पर्याय नसतो . त्यामुळे हॉटेल - बार हि कोरोना संसर्ग झपाट्याने पसरण्याची केंद्र ठरण्याची भीती व्यक्त होत आहे .