शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात आज १ हजार ६६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 23:12 IST

जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६७ हजारांवर; ८९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ६६३ नवीन रुग्ण बाधित झाले असून, १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६७ हजार ६०५ तर मृतांची संख्या एक हजार ८९२ इतकी झाली आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रमध्ये रविवारी सर्वाधिक ४२७ रुग्ण नव्याने दाखल झाले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार ९०७ तर मृतांची संख्या २४६ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रमध्ये २५७ बाधितांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची १५ हजार ७७३ तर मृतांची संख्या ५७० च्या घरात गेली. नवी मुंबई महापालिकेच्या परिसरातही २८८ नवीन रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. बाधितांची ११ हजार ४२६, तर मृतांची संख्या ३४३ वर पोहोचली. मीरा-भाईंदरमध्ये १३६ रुग्ण नव्याने दाखल झाले असून एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ५५८ तर मृतांची संख्या २२० इतकी झाली. भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रात ३५ जण बाधित झाले. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ९८ वर पोहोचली. उल्हासनगरमध्ये ९४ रुग्णांची आणि तिघांच्या मृत्यूची नोंद झाली.याठिकाणी बाधितांची संख्या पाच हजार ६२६ तर मृतांची संख्या ८३ वर पोहोचली आहे. अंबरनाथमध्ये ७८ रुग्ण दाखल झाले असून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार १०८ तर मृतांची संख्या ११६ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ७९ रुग्ण नव्याने दाखल झाले. त्यामुळे याठिकाणी आतार्पयच्या बाधितांची संख्या एक हजार ९१३ इतकी झाली. ठाणो ग्रामीण भागांत १६९ रुग्णांची, तर एकाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार १९६, तर मृतांची संख्या १०८ वर पोहोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या