शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अ‍ॅण्टीजेन टेस्टसाठी घेणार १० हजार कीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 01:17 IST

या टेस्टसाठी लागणारे १० हजार कीट पहिल्या टप्प्यात खरेदी करणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील हायरिस्क कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तातडीने अ‍ॅण्टीजेन टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टसाठी लागणारे १० हजार कीट पहिल्या टप्प्यात खरेदी करणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. अ‍ॅण्टीजेन टेस्टद्वारे संबंधितांना कोरोना झाला आहे की नाही, याचे निदान होऊ शकते. या टेस्टचा उपयोग महापालिकेतील हायरिस्क कोरोना स्पॉट व कंटेनमेंट झोनमधील तापसदृश लक्षणे असलेली व्यक्ती, हायरिस्क व्यक्तींच्या संपर्कात असलेले परंतु, लक्षणे नसलेले व्यक्ती व हृदयविकार, यकृत, फुप्फुस, मूत्रपिंड, मधुमेह, रक्तदाब आदी विकार असलेले रुग्ण, केमोथेरपी उपचार सुरू असलेल्या कॅन्सरग्रस्तांसाठी केला जाणार आहे. तसेच एचआयव्हीबाधित, अवयवप्रत्यारोपण, वृद्ध, गरोदर महिलांची टेस्ट केली जाणार आहे. त्यामुळे त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच त्यांच्यावर तातडीने उपचार करता येतील.अ‍ॅण्टीजेन टेस्टचा रिपोर्ट ४५ मिनिटांत उपलब्ध होतो. रिपोर्ट हाती येताच उपचार सुरू करणे शक्य होईल. अ‍ॅण्टीजेन टेस्टला आयसीएमआरने मान्यता दिली असली, तरी या टेस्टसाठी लागणारे कीटपुरवठा करणारी कंपनी एकच आहे. त्यामुळे प्रत्येक महापालिकेने हे कीट खरेदी करण्याचे आदेश राज्य सरकारच्या आरोग्य विभागातून दिले गेले आहेत.दरम्यान, कोरोना टेस्टसंदर्भात भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेणारे दौरे सुरू आहेत. त्यांच्या दौºयापाठोपाठ कीट खरेदीचा निर्णय घेतला गेल्याने सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात ही लॅब सुरू होईल, असे सांगितले होते. परंतु, चौथा आठवडा सुरू झाला तरी लॅब सुरू झालेली नाही. आणखी १० दिवस लॅब सुरू होण्यास लागणार आहेत. या लॅबसाठी आयसीएमआरकडून मान्यता लागते. ती मिळविण्यात वेळ गेल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.>लॅबला लागला विलंबकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या चार हजारांवर आहे. दिवसाला सरासरी कोरोनाचे नवे २०० रुग्ण आढळून येत आहेत.महापालिकेकडून कोरोनाच्या चाचण्या केल्या जातात. मात्र, त्याचे अहवाल मुंबईतील रुग्णालयाकडून येण्यास विलंब होतो. त्यामुळे महापालिकेने कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे कोरोना टेस्ट लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस