शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:10 IST

हंड्यांना मागणीच नाही; कुंभारांमध्ये चिंतेचे वातावरण

कल्याण : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दहीहंडीच्या उत्सवाला सरकारी यंत्रणांकडून परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे दहीहंडीसाठी लागणारी हंडी तयार करणारे शहरातील कुंभारवाड्यातील कुंभार यंदा चिंतातुर आहेत. यंदा हंडीची विक्री होईल का, असा प्रश्न त्यांना पडला आहे.कोरोना रोखण्यात अद्याप सरकारी व आरोग्य यंत्रणेला यश आलेले नाही. सध्या लॉकडाऊन शिथिल केले असले, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. श्रावणात विविध सणांची रेलचेल असते. त्याचबरोबर गणेशोत्सवाचीही चर्चा सुरू झाली आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी गाड्या सोडा, दुकानदारांसाठी असलेला सम-विषम तारखेचा नियम रद्द करा, अशा विविध मागण्या विविध स्तरांतून केल्या जात आहेत. मात्र, कुंभारांसाठी कोणी काही बोलण्यास तयार नाही.गणेशमूर्ती तसेच दहीहंडीसाठी हंड्या, नवरात्रासाठी गरबा, पणत्या तयार करण्यात कल्याणमधील कुंभारवाड्याचे नाव प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीला काही अंशी मागणी असली, तरी मोठ्या मूर्ती तयार करण्यात आलेल्या नाहीत. गणेशोत्सवापूर्वी १२ आॅगस्टला दहीहंडी आहे. मात्र, हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यास सरकारी यंत्रणांकडून परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे यंदा तयार केलेल्या हंड्या पडून राहणार आहेत. हंडीला मागणीच नसल्याचे कुंभारवाड्यातील कारागीर धनाजी कुंभार यांनी सांगितले.दरवर्षी मोठ्या स्वरूपात सार्वजनिक ठिकाणी व गल्लीबोळांतील बालगोपाळ मित्र मंडळांकडून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी लहान, मोठी हंडी बांधली जाते. गेल्या वर्षी ५०० हंड्या विकल्या गेल्या होत्या. यंदा हंडीची एकही आॅर्डर नाही. त्यामुळे तयार केलेल्या हंडीचे करायचे काय, असा प्रश्न कुंभारवाड्यातील कारागिरांना सतावत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या