शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेच्या वाडिया रुग्णालयातून कोरोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 00:24 IST

कोरोना रुग्णांचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाºया रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या (वागळे इस्टेट) पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अफसर तेजपाल मंगवाना या वॉर्ड बॉयला ताब्यात घेतले आहे. कहर म्हणजे दोन मृत पावलेल्या व्यक्तींचेही कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट येथील कर्मचाºयाने दिले.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेने घेतले एकास ताब्यातअवघ्या १२०० रुपयांमध्ये वॉर्ड बॉय देत होता कोरोनाचे निगेटीव्ह रिपोर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोना रुग्णांचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाºया रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या (वागळे इस्टेट) पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अफसर तेजपाल मंगवाना या वॉर्ड बॉयला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.अवघ्या १२०० रुपयांमध्ये ठाणे महापालिकेच्या टेंभी नाका येथील वाडीया रुग्णालयात कोरोना रु ग्णांचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देणारे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे तसेच असाच एक बनावट आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट देतांना मंगवाना याला या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याची याप्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.* खाजगी चाचणी केंद्रातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देण्याच्या घटनेनंतर असेच बनावट रिपोर्ट तयार करुन देणारे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती ठाण्यातील एका समाजसेवकास मिळाली होती. त्याची खातरजमा करीत या समाजसेवकाने कोरोनाचे आधी पॉझिटिव्ह असलेले काही रिपोर्टचे नंतर बनावट निगेटिव्ह रिपोर्ट वाडिया रुग्णालयातून मिळविले. कहर म्हणजे दोन मृत पावलेल्या व्यक्तींचेही कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट येथील कर्मचाºयाने दिले. याशिवाय, चार हयात असलेल्या व्यक्तींचेही रिपोर्ट याच रुग्णालयातून मिळवले. त्यानंतर हा प्रकार गुन्हे अन्वेषण विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. स्वॅब न घेताच हे रिपोर्ट दिले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशीमध्ये नेमकी यातील आणखी कोणाचा सहभाग आहे का? हे स्पष्ट होईल, असेही तपास अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस