शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पश्चिमेतील कोरोनाचे हॉटस्पॉट पुन्हा होणार सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 06:48 IST

शनिवारपर्यंत कोरोनाची रूग्णसंख्या ३४ हजार ६८६ पर्यंत पोहचली आहे. तर मृतांची संख्या ७२१ आहे.

डोंबिवली: कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील वाढते कोरोनाचे रूग्ण पाहता कोरोनाचे हॉटस्पॉट क्षेत्र पुन्हा एकदा सील करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. केडीएमसी परिक्षेत्रात सध्या ४४ हॉटस्पॉट आहेत. महापालिकेने सुरू केलेल्या कार्यवाहीत हॉटस्पॉट क्षेत्रात बाहेरील व्यक्तींना ये-जा करण्यास बंदी घातली असून केवळ अत्यावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.शनिवारपर्यंत कोरोनाची रूग्णसंख्या ३४ हजार ६८६ पर्यंत पोहचली आहे. तर मृतांची संख्या ७२१ आहे. वाढणाऱ्या रूग्णसंख्येचा एकूणच आढावा घेता डोंबिवली पूर्व आणि कल्याण पूर्व- पश्चिममध्ये सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. महापालिका क्षेत्रातील अ प्रभागात 3, ब आणि ह प्रभागात प्रत्येकी ६, क प्रभागात ७, जे आणि ड प्रभागामध्ये प्रत्येकी ३, फ आणि ग प्रभागात प्रत्येकी ५, आय प्रभागात २ आणि ई प्रभागात ४ हॉटस्पॉट क्षेत्रांचा समावेश आहे. अनलॉकमध्ये नागरिकांचे नियम पाळण्याकडे दुर्लक्ष होत आहे. हेच चित्र हॉटस्पॉटमध्ये निर्बंध घालूनही सदैव दिसत आहे. परिणामी हॉटस्पॉटमधील रूग्णसंख्येवर अंकुश आणताना महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची कसोटी लागल्याचे पाहयला मिळत आहे. गेल्या सोमवारी ग प्रभागक्षेत्र अंतर्गत तुकारामनगरमधील हॉटस्पॉट क्षेत्र सील करण्यात आले होते. परंतु नागरिकांचा सील करण्यास तीव्र विरोध झाला होता. शनिवारी कल्याणमधील क प्रभागातील पारनाका येथील हॉटस्पॉट सील करण्यात आला. त्याचबरोबर अन्य ठिकाणचे हॉटस्पॉटही सील करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.चाचणीसाठी गृहसंकुलांनी घेतला पुढाकारइमारतींमध्ये कोरोना वाढत असल्याचे केडीएमसीच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. दुसरीकडे कोरोनाचा सुरू असलेला प्रादुर्भाव पाहता ठाकुर्ली पूर्वेतील कल्याण- डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याच्या परिसरात असलेल्या सर्वाेदय लीला या गृहसंकुलातील रहिवाशांनी पुढाकार घेत शनिवारी अ‍ॅण्टीजेन चाचणीची विशेष मोहीम राबविली.सर्वाेदय लीला सोसायटी आणि साईलीला उत्सव मंडळ यांच्या वतीने झालेल्या चाचणी मोहिमेला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती सचिव लक्ष्मण इंगळे आणि योगेश शेलार यांनी दिली. केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या डॉ. अनुपमा साळवे या उपस्थित होत्या.

टॅग्स :kalyanकल्याण