शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वृंदावन भागात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण आणखी एका वैद्यकीय सेवा देणाऱ्यालाही झाली लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 13:19 IST

वृंदावन येथील १०० इमारतींची वसाहत असलेल्या आणि जवळ जवळ १० हजार लोकसंख्या असलेल्या भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे येथील सर्वच नागरीक भयभीत झाले आहेत. या रुग्णाला उपाचारासाठी आता कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शहरातील आणखी एका वैद्यकीय सेवा देणाºयासह कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे : कळव्यातील मनिषा नगर भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आता ठाण्यातील वृंदावन भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. येथील एका ६७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार रात्री उशिरा त्याला क्वॉरन्टाइन करुन कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तो दुबई येथे पत्नी आणि मुलासमवेत गेला होता. त्यामुळे आता त्याची पत्नी आणि मुलालाही पालिकेने घोडबंदर भागातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे ठाण्यात आणखी एका वैद्यकीय सेवा देणाऱ्यासही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.               ठाणे शहरात आता कोरोना बाधीतांची संख्या ही २१ झाली आहे. रविवारी दिवसभरात शहरात तीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यात एका रुग्णाची भर पडली. हा रुग्ण वृंदावन भागातील असून तो ६७ वर्षांचा आहे. फेब्रुवारी महिन्यात तो पत्नी आणि मुलासह दुबईला फिरण्यास गेला होता. त्यानंतर १० मार्चच्या आसपास तो पुन्हा भारतात आला. त्यानंतर या संपूर्ण कुटुंबाने स्वत:ला क्वॉरन्टाइन केले होते. तसेच त्यांची एक दिवस आड तपासणी देखील केली जात होती. विशेष म्हणजे या वृध्द व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणतेही लक्षणे आढळून आली नव्हती. तसेच त्यांना डायबीजचा त्रासही आहे. मधल्या काळात त्यांच्या पायाला जखम झाली होती. त्यामुळे ते येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. मात्र आधी तुमची कोरोना तपासणी निगेटीव्ह आहे का ते दाखवा त्यानंतरच तुमच्यावर उपचार करु असे रुग्णालय प्रशासनाने त्यांना सांगितले होते. त्यानुसार त्यांनी दोन दिवसापूर्वी कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर रविवारी त्यांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांची पत्नी आणि मुलगा यालाही घोडबंदर भागातील कासारवडली येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान आता सुरक्षिततेचा उपाय म्हणून येथील ५०० मीटरचा परिसर सील करण्यात आला असून ते ज्या इमारतीत राहत होते ती इमारत आणि आजूबाजूच्या पाच ते सात इमारती देखील सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय सोमवारी येथील केवळ औषध दुकाने वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच संबधींत व्यक्तींच्या संपर्कात इतर कोणी आले होते, का? याचाही शोध पालिकेच्या माध्यमातून सुरु झाला आहे.   

 दुसरीकडे कळवा भागातील मनिषा नगर सापडलेल्या एका कोरोना रुग्ण हा ठाण्यातील नौपाडा भागातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. परंतु त्यावर उपचार करणाºया खाजगी वैद्यकीय सेवा देणाऱ्यासही आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तो २८ वर्षीय असून त्याच्यावर आता त्याच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तसेच या वैद्यकीय सेवा देणाऱ्याच्या संपर्कात आणखी कीती नागरीक आले आहेत, त्याची माहिती गोळा करण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरु झाले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या