शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांच्या भक्तीपुढे कोरोनाची धास्ती झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 00:03 IST

तरी गणरायाच्या पूजाअर्चा, नैवेद्य यासाठी लागणाऱ्या सामानांची खरेदी करण्यासाठी ठाणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले होते.

ठाणे : गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. मात्र, शुक्रवारी सकाळपासून ठाणे मार्केटमध्ये खरेदीसाठी झालेल्या गर्दीने सायंकाळपर्यंत उच्चांक गाठला होता. बाप्पांच्या आगमनाच्या तयारीसाठीचा त्यांचा उत्साह पाहता गणरायाच्या भक्तीने कोरोनानामक धास्तीला मागे टाकलेले दिसले. बहुतांश ठाणेकर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असले, तरी गणरायाच्या पूजाअर्चा, नैवेद्य यासाठी लागणाऱ्या सामानांची खरेदी करण्यासाठी ठाणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले होते.कोरोनामुळे कोणताही सणउत्सव किंवा गर्दी जमेल, असे कार्यक्रम करायला परवानगी नाही किंवा ते मोजक्या माणसांमध्येच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तेच नियम यंदा गणेशोत्सवासाठीही लागू होणार आहेत. कोरोनामुळे अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव रद्द केला. त्याऐवजी वेगवेगळे आरोग्यविषयक उपक्रम होणार आहेत. तरी, घरोघरी मात्र साधेपणाने का होईना गणरायाची पूजाअर्चा केली जाणार आहे. सजावट नसली तरी गणरायाप्रति असलेल्या भक्तीमुळे आगमनात, पूजाअर्चेमध्ये किंवा त्याच्या पाहुणचारात कमी राहू नये, यासाठी भक्तांची लगबग पाहायला मिळते आहे. गणरायाच्या आगमनानिमित्त असणारा त्यांचा उत्साह कमी झालेला नाही.ठाणे मार्केटमध्ये सर्व दुकानेही सुरू झालेली असून बाप्पांच्या पूजेचे सामान, नैवेद्य, सजावटीचे साहित्य, भाजी-फळे-फुले इ. साहित्याची ठाणेकरांनी खरेदी केली. गेले काही दिवस लपूनछपून धंदा लावणाºया फेरीवाल्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटली होती. भाजीमंडईतही कोरोनापूर्वी जशी गर्दी असायची, तशीच गर्दी दिसत होती. कपड्यांच्या दुकानांतून दरवर्षीच्या तुलनेत गर्दी कमी असली, तरी लहान मुलांच्या हौसेसाठी पालक कपडे खरेदी करताना दिसले.।पावसातही केली खरेदीसकाळपासून ठाण्यात पाऊस सुरू होता. तरीही, लोकांची खरेदी सुरू होती. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली आणि उरलीसुरली खरेदी करायला ठाणेकर घराबाहेर पडले. कोरोनामुळे सर्वच ग्राहकांनी आणि विक्रेत्यांनी मास्क लावलेले होते. परंतु, बहुतांश सगळ्यांचे मास्क हे गळ्यात लटकलेले दिसत होते. गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले होते.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव