शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा फटका बसल्याने ठामपाच्या तिजोरीत खडखडाट; GST मधून निघणार कर्मचाऱ्यांचा पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:33 IST

मागील वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोनाचा कहर आहे. त्याचा महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावरदेखील परिणाम झाला आहे.

ठाणे  : मालमत्ता कर आणि पाणीकरातून ठाणे महापालिका थोडीशी सावरल्यासारखी दिसत होती. परंतु, कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती पुन्हा खालावली आहे. त्यातल्या त्यात जीएसटीची रक्कम तिजोरीत जमा झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार निघेल अशी परिस्थिती समोर आली आहे. मात्र, शहर विकास विभागासह इतर विभागांनी घोर निराशा केल्याने महापालिकेच्या तिजोरीवर त्याचा परिणाम झाला असून, केलेल्या कामांचे पैसे देण्यासाठीही निधी नाही. यामुळे ठेकेदारांची बिलेदेखील थांबविली आहेत.

मागील वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोनाचा कहर आहे. त्याचा महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावरदेखील परिणाम झाला आहे. त्यामुळे आयुक्तांनी अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या प्रकल्पांना वाव न देता काही कागदावरील प्रकल्पांना तूर्तास कात्री लावली आहे. परंतु, असे असतांनाही आता फेब्रुवारी अखेरपासून शहरात पुन्हा कोरोनाचा कहर दिसू लागला आहे. त्यामुळे महापालिकेने यासाठी राखीव निधी ठेवण्याचे निश्चित करून इतर कामांचा निधी कापण्याचा विचार केला आहे. तसेच ठेकेदारांची बिलेदेखील याच कारणामुळे थांबविल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. 

त्यातल्या त्यात महापालिकेला मालमत्ताकर आणि पाणी विभागाने तारल्याचे दिसून आले आहे. मालमत्ताकर विभागाला ६४५ कोटी रुपयांचे लक्ष दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ५७७ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. पाणी विभागाकडून १६० कोंटीच्या तुलनेत १३७ कोटी रुपयांची वसुली  झाली आहे. त्यानुसार इतर सर्व विभागांचे मिळून महापालिकेच्या तिजोरीत दोन हजार ३३५ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातून महसुली खर्च एक हजार ४९६ कोटी आणि भांडवली खर्चावर ५१० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तसेच इतर कामांसाठीदेखील निधी खर्च झाला असल्याने महापालिकेच्या तिजोरीला हा भार पेलणे कठीण झाले आहे.

तिसऱ्या यादीपर्यंतची बिले अदाठाणे महापालिकेच्या तिजोरीत जसजसा निधी जमा होऊ लागला, त्यानुसार मागील मार्च महिन्यात झालेल्या कामांचे आणि इतर कामांचे पैसे टप्प्याटप्प्याने करून १०० टक्के बिल अदा केले आहे. 

परंतु, चौथ्या यादीचे काम सुरू असून, त्यासाठी किती निधी द्यावा लागणार याचा अंदाज अद्यापही नाही, त्यामुळे यादी तयार करण्याचे काम जरी सुरू असले तरी तिजोरीत पैसे किती असणार त्यानुसार टप्प्याटप्प्याने बिले काढण्याचा पालिकेचा विचार आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ६५ कोटींचा खर्च ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जीएसटीचे ८४० कोटींपैकी ८३९ कोटी जमा झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर महिनाकाठी ६५ कोटींच्या आसपास खर्च होत आहे.  स्टॅम्प ड्युटीच्या १०० कोटींवर आता लक्षमहापालिकेच्या तिजोरीत येत्या आर्थिक वर्ष अखेर स्टॅम्प ड्युटीची १०० कोटींची रक्कम मिळणे अपेक्षित आहे. त्या रकमेतूनच ठेकेदारांची बिले देण्याचा पालिकेचा विचार आहे. परंतु, किती रकमेची बिले द्यायची याचा अद्यापही विचार झालेला नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.   

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या