शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय सेवा देणाऱ्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागणी, शहरात दिवसभरात दोन रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 18:35 IST

ठाण्यात आज दिवसभरात आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये एका वैद्यकीय सेवा देणाऱ्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंब्य्रातील अमृत नगर भागात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधीतांची संख्या आता २४ झाली आहे.

ठाणे : ठाण्यात मागील काही दिवसात कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. आतापर्यंत शहरात २२ रुग्ण आढळले होते. त्यात मंगळवारी आणखी दोन रुग्णाची भर पडली आहे. एका डॉक्टराला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. आता त्याच्या पत्नीचा रिपोर्टही पॉझीटीव्ह आला आहे. तिला आता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे मुंब्य्रात आता आणखी एका रुग्णाची भर पडल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे मुंब्य्राची आकडेवारी तीन झाली असून आतापर्यंत त्यात एकाचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे आता शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही २४ झाली आहे.       काही दिवसांपूर्वी रामचंद्र नगर भागात असलेल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्यास कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या पत्नीलाही पालिकेने क्वॉरान्टाइन केले होते. आता तिचाही रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. तिला आता जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आता सुरु झाला आहे.दुसरीकडे गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहन करुनही मुंब्य्रात मात्र रस्त्यावर गर्दी होतांना दिसत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील येथील नागरीकांना आवाहन केले होते. अखेर या भागात मंगळवार पासून पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असेल तरी नागरीक रस्त्यावर विनाकारण फिरतांना दिसत होते. त्यातच मंगळवारी मुंब्य्रातील अमृत नगर भागात आधीच्या रुग्णाच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेचे डॉ. आर. टी. केंद्रे यांनी दिली आहे. तर आतापर्यंत मुंब्य्रात तीन रुग्ण आढळले आहेत. त्यातील एकाचा मृत्यु झाला आहे. तर शहराचा कोरोना बाधीतांचा आकडा हा २४ वर गेला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या