शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News: लॉकडाऊनसाठी ठाणे पोलिसांची आता कडक नाकाबंदी

By जितेंद्र कालेकर | Updated: April 23, 2021 00:07 IST

राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’या मोहिमेंतर्गत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी २२ एप्रिलपासून लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच शहर आणि जिल्हयाची वेस अत्यावश्यक कारणाशिवाय ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्दे जिल्हाभर राहणार पोलीस बंदोबस्त राज्य राखीव दलाच्या पाच तुकडयाही तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’या मोहिमेंतर्गत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी २२ एप्रिलपासून लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच शहर आणि जिल्हयाची वेस अत्यावश्यक कारणाशिवाय ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. अशा कारवाईसाठी ठाणे ग्रामीणमध्ये चार तर शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील २७ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्य शासनाने गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे रोजी सकाळी ७ पर्यंत राज्यभर कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये शहर आणि जिल्हा बंदीबाबतचे नियम अधिक काटेकोरपणे पाळले जाणार आहेत. त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित येणाºया पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्हयांच्या सीमेवर तपासणी नाके उभारले आहेत. यामध्ये कसारा, टोकावडे, गणेशपूरी आणि कुळगाव या चार महत्वाच्या नाक्यांसह पोलीस ठाण्यांच्या अंतर्गतही नाकाबंदी आहे. याशिवाय, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमधील ३५ पोलीस ठाण्यांतर्गत २७ ठिकाणी चेक नाके उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडणाºयांवर याठिकाणी साथ प्रतिबंधक कायदा कलम १८८ अंतर्गत कारवाईचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या अधिपत्याखालील हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त राहणार असून पोलीस ठाण्यांच्या पातळीवरील पेट्रोलिंग, फिक्स पॉर्इंट, कोविड सेंटर आणि महत्वाच्या नाक्यांवर पोलिसांमार्फत कारवाई केली जाणार आहे.*असा राहणार बंदोबस्त-राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या (एका कंपनीत १०० कर्मचारी), ५०० गृहरक्षक दलाचे जवान, मुख्यालयातील तीन हजार ५०० पोलीस तसेच स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तपासणीला तैनात राहणार आहे.* अशी होणार कारवाई-अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणारे, वाहनांद्वारे शहर आणि जिल्हा ओलांडणारे यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वैद्यकीय तसेच अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.* अत्यावश्यक तसेच रुग्णालयीन कारण असेल तर तशी कागदपत्रे संबंधितांनी दाखविल्यास त्यांना अनुमती दिली जाईल. पण बाहेर जाण्यासाठी कोणताही पास दिला जाणार नसल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी