शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

corona virus : ठाणे जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या घटली; दिवसभरात अवघ्या पाच जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 21:09 IST

ठाणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात मंगळवारी ३५५ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ४७ हजार ७५७ रुग्ण संख्या झाली आहे.

ठाणे - जिल्ह्यातील विविध रुग्णालयात मंगळवारी ३५५ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ४७ हजार ७५७ रुग्ण संख्या झाली आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत आज मृतांची संख्या कमालीची घटली आहे. दिवसभरा अवघ्या पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३८ झाली आहे. 

ठाणे परिसरात १०३ रुग्ण आढळून आले आहेत. या शहरात आता ५६ हजार ८७० बाधीत झाले. अवघे तीन मृत्यू झाल्यामुळे शहरातील मृतांची संख्या एक हजार ३३४ झाली. कल्याण - डोंबिवलीत ९८ रुग्णांची वाढ होऊन या शहरात आता ५८ हजार ६७१ बाधीत झाले आहे. तर एक हजार ११८ मृत्यू कायम आहेत. 

 उल्हासनगरला ११ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. येथे ११ हजार ४७२ बाधीत रुग्णांसह आजपर्यंत ३६३ मृत्यू नोंदले आहेत. भिवंडीला सहा बधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ६५० झाले असून मृतांची संख्या ३५२ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये १९ रुग्णांची नोंद असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात २५ हजार ८४० बाधितांसह ७९१ मृतांची नोंद आहे.  अंबरनाथमध्ये १२ रुग्णांची नव्याने वाढ झाली असून एक मृत्यू आहे. येथे बाधितांची संख्या आठ हजार ४१९ झाली असून ३०८ मृत्यू नोंदले आहेत. बदलापूरला २१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे येथे नऊ हजार ६६ बाधीत झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या १२० आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३२ मृतांची नोंद झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत १८ हजार ९२८ झाले असून मृत्यू ५८२ झाले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे