मुंब्रा : ठाणे महापालिका क्षेत्रातील दिव्यांग कोरोनाच्या लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी शुक्रवारपासून दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेसाठी समावेश केलेल्या केंद्रामधील एक असलेल्या मुंब्य्रातील कौसा भागातील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममधील केंद्रामध्ये पहिल्या दिवशी १५ दिव्यांगांनी लस घेतली. प्रत्येक शुक्रवारी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घ्यावा, यासाठी या मोहिमेची माहिती दिव्यांगांपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता असून, केंद्रावरून तसे प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती केंद्राच्या समन्वयक डॉ. शार्मिन डिंग्गा यांनी ‘लोकमत’ला दिली.
मुंब्य्रातील केंद्रामध्ये १५ दिव्यांगांनी घेतली कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST