शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: लसीकरण निम्म्यापेक्षा कमी, रुग्ण वाढत असताना केंद्रे बंद; कोव्हॅक्सिन संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 02:35 IST

दुसऱ्या डोससाठी ठेवलेल्या कोविशिल्डचा वापर

ठाणे  : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच ठाण्यातील कोव्हॅक्सिन लसीचा साठा जवळपास संपल्याने दररोज सुमारे १० हजार नागरिकांचे होणारे लसीकरण निम्म्यावर आले. मंगळवारी ३७२२ लोकांचे लसीकरण झाले. लसीकरणाकरिता सुरू केलेल्या केंद्रांमध्ये कपात करण्याची नामुष्की साथ वाढत असतानाच आली आहे. अगोदर ५१ केंद्रांवर सुरू असलेले लसीकरण मंगळवारी ३४ केंद्रांवरच सुरू होते. तब्बल १७ केंद्रे बंद ठेवण्यात आली. साठा येण्यास जेवढा विलंब होईल तेवढी लसीकरणाची प्रक्रिया धीमी होणार आहे. 

आत्मनिर्भर भारत योजनेचा भाग असलेल्या स्वदेशी  कोव्हॅक्सिनचा साठा संपला असल्याने लसीकरण बंद करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. कोविशिल्ड ६३ हजार लस शिल्लक असून ज्यांनी पहिला डोस त्या लसीचा घेतला आहे त्यांना दुसऱ्या डोससाठी त्या वापरायच्या आहेत. कोविशिल्डचा साठादेखील आठ दिवस पुरेल एवढाच असल्याने पहिला डोस घेतलेल्यांना कोणती लस द्यायची, असा प्रश्न उपस्थित होणार आहे. 

महापालिका हद्दीत रोज ८ ते १० हजार नागरिकांचे लसीकरण सुरू होते; परंतु आता लसीचा तुटवडा झाल्याने शहरातील १७ केंद्रे बंद करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सोमवारी लस उपलब्ध करून देण्याच्या मुद्यावरून स्थायी समितीत गदारोळ झाला होता.  मंगळवारी लसीचा साठा उपलब्ध होईल, असे आश्वासन आरोग्य विभागाने दिले होते; परंतु मंगळवारी कोव्हॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारी शिल्लक असलेला दोन हजार कोव्हॅक्सिन लसीचा साठा मंगळवारी संपुष्टात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. लसीकरणावरून केंद्र व राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत; परंतु लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे.

दरम्यान, कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने आता लसीकरण बंद करावे लागणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती; परंतु तूर्त कोविशिल्डचा शिल्लक ६३ हजार लसींचा साठा वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारपासून ठाण्यात पुन्हा कोविशिल्ड लस दिली जाणार आहे; ज्यांना कोविशिल्डची पहिली लस दिली होती त्यांच्यासाठी तो साठा ठेवला होता. आता तोच साठा वापरून लसीकरण सुरू असल्याचे भासवले जाणार आहे. कोविशिल्डचा साठा यापुढे उपलब्ध होणार नाही, अशी माहिती अधिकारी खासगीत देत असताना ज्यांनी पहिला डोस कोविशिल्डचा घेतला त्यांना लसीचा दुसरा डोस कसा उपलब्ध होईल, याबाबत ठाणेकरांना शंका आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस