शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! 16 किमीचा पायी प्रवास करत ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकाने केले दापूरमाळचे लसीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 12:42 IST

Corona Vaccine : शहापूर तालुक्यातील कसारा भागातील विहीगाव उपकेंद्रातर्गत दापूरमाळ गाव वसले आहे. येथे कोणत्याही स्वरुपात दळणवळणाची सोय नाही.

ठाणे - एका बाजूने पसरलेला सह्याद्रीचा डोंगर, माती-दगड गोट्यांची खडतर पाऊलवाट आणि आजूबाजूने वेढलेल्या घनदाट झाडा-झुडपातून तब्बल सोळा किलोमीटरचा पायी प्रवास करत ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कोविड १९ नियंत्रण लसीकरण पथक सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दापूरमाळ गावात बुधवारी पोहोचलं. गावातल्या प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन पात्र असणाऱ्या सर्व गावकऱ्यांचे लसीकरण केले. शिवाय प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणीही केली. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय टीम केलेल्या धाडसी आणि अतुल्य कार्याबद्दल ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संपूर्ण टीमचे कौतूक केले.  

शहापूर तालुक्यातील कसारा भागातील विहीगाव उपकेंद्रातर्गत दापूरमाळ गाव वसले आहे. येथे कोणत्याही स्वरुपात दळणवळणाची सोय नाही. त्यामुळे येथील नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल भोरे यांच्यासह नामदेव फर्डे, बाळू नीचिते, सुजाता भोईर, भारती ठाकरे, झुगरे, खोरगडे यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन लसीकरण केले. 

या गावाची एकूण लोकसंख्या २४६ असून कोविड १९ लसीकरणासाठी एकूण १३८ लाभार्थी होते. यामध्ये दोन गरोदर माता आणि तीन स्तनदा मातांचाही समावेश होता. या सर्व लोकांचे लसीकरण केल्यानंतर आरोग्य पथकाने येथे आरोग्य शिबीरही घेतले. आरोग्य शिबीर अंतर्गत  बालरोग, गरोदर माता, स्तनदा माता, त्वचा रोग तपासणी केली. आवश्यक असणाऱ्याना  औषधी देऊन योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत  ग्रामीण भागात कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी प्रत्येक गावासह वाडी, पाडे, तांडे, वस्त्यांवर लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिदुर्गम भाग जरी असला तरीही त्या भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग नियोजन करत आहे. ग्रामीण भागातील शंभर टक्के लाभार्थी नागरिकांचे लसीकरण करणे, कोरोनाची भीती कमी करून लोकांमध्ये जनजागृतीचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीष रेंघे यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस