शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination: उल्हासनगरात लसीकरणास प्रारंभ, लसीचा पहिला मान पौर्णिमा खरात यांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 18:31 IST

कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचा प्रारंभ आयटीआय कॉलेज येथील आरोग्य सेंटर मध्ये प्रारंभ झाला असून लसीचा पहिला मान आरोग्य सेविका पौर्णिमा खरात यांना मिळाला.

- सदानंद नाईक उल्हासनगर : कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचा प्रारंभ आयटीआय कॉलेज येथील आरोग्य सेंटर मध्ये प्रारंभ झाला असून लसीचा पहिला मान आरोग्य सेविका पौर्णिमा खरात यांना मिळाला. प्रत्येक दिवशी १०० जणांना डॉक्टरांच्या निरक्षणाखाली लस देणार असल्याची माहिती वैधकीय अधिकारी डॉ दिलीपकुमार पगारे यांनी दिली.

 उल्हासनगरला कोविड-१९ प्रतिबंधकच्या ५ हजार लस आल्या असून नेहरू चौकातील महापालिका आरोग्य केंद्रात लसीचे साठवण करण्यात आल्या आहेत. दररोज १०० जणांना लस देण्याचा मानस महापालिका आरोग्य विभागाने व्यक्त केला. कॅम्प नं-३ येथील आयटीआय कॉलेज मधील आरोग्य केंद्रात लसीचा शुभारंभ महापौर लिलाबाई अशान, आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त मदन सोंडे, सभागृहनेते भरत गंगोत्री, स्थायी समिती सभापती विजय पाटील, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ दिपककुमार पगारे, वैधकीय अधिकारी डॉ राजा रिजवानी, डॉ अनिता सपकाळे यांच्यासह नगरसेवक, पक्ष पदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आला आहे. ११ वाजून १५ मिनिटांनी लसीचा शुभारंभ करण्यात येणार होती. मात्र शुभारंभ कार्यक्रमात १ तास लांभल्याने लसीकरणास उशीर झाला. 

महापालिकेने नोंदणी केलेल्या आरोग्य सेवकांना ऑनलाईन मेसेज पाठवून विशिष्ट वेळेत बोलाविण्यात येते. लसीकरणा पूर्वी त्यांना माहिती देऊन त्यानंतर लस देण्यात येते. लस दिल्यानंतर डॉक्टरांच्या निराक्षणाखाली अर्धा तास त्यांना ठेवल्यानंतर घरी सोडण्यास येते. तसेच त्यांना काही त्रास झाल्यास, त्वरित दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधण्यास सांगितले जाते. शहरातून लसीकरणाची पहिला मान आरोग्य सेविका पौर्णिमा हर्षल खरात यांनी लसीचे स्वागत करून शासनाचे धन्यवाद मानले. लस घेतल्या नंतर कोणताही त्रास झाला नाही. अशी प्रतिक्रिया दिली. तर इतरांच्या मनात धाकधूक असलेतरी, लसी बाबत उत्सुकता होती. सकाळी लसीकरण मोहीम शुभारंभ कार्यक्रम लांबल्याने, लसीकरणास उशिराने सुरवात झाली. 

आयुक्त डॉ राजा दयानिधी यांचा उदोउदो आयटीआय कॉलेज येथील आरोग्य केंद्रात लसीकरण शुभारंभ कार्यक्रमात आयुक्त राजा दयानिधी यांचा सर्वच पक्ष पदाधिकाऱ्यांनी उदोउदो केला. आयुक्त स्वतः डॉक्टर असल्याने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना वेळेत राबविल्याने, शहरातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले. आयुक्तांच्या नावात दया असल्याने, त्यांनी शहरवासीयांना दया दाखवून विकास कामांना त्वरित निधी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसulhasnagarउल्हासनगर