शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: १५ जणांनी घेतली  बेकायदेशीर लस; चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 09:57 IST

दोषी असणाऱ्या सर्वांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस

ठाणे : अभिनेत्री मीरा चोप्रा हिचे बनावट ओळखपत्र तयार करून तिला बेकायदेशीरपणे लस दिल्याचे उघड झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने अशा प्रकारे २१ श्रीमंत तरुण - तरुणींची बनावट ओळखपत्र तयार करून १५ जणांनी अशा प्रकारे लस घेतल्याची माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचे बनावट ओळखपत्रही तयार केले होते. मात्र, तिला लस दिलेली नाही. यात दोषी असणाऱ्या सर्वांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस अहवालात केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद केले असताना ठाणे महापालिकेने मात्र अभिनेत्री मीरा चोप्राला फ्रंटलाईन वर्कर दाखवून पार्किंग प्लाझा येथे लस दिली होती. विशेष म्हणजे ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा येथे मनुष्यबळ पुरविणाऱ्या ओम साई आरोग्य सेवा या संस्थेने बनावट ओळखपत्र तयार करून तिला सुपरवायझर दाखवून ही लस दिली होती. त्यानंतर तिने स्वतःच सोशल मीडियावर छायाचित्रे टाकून लस घेतल्याचे जाहीर केले होते. या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी उपायुक्त (आरोग्य) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून, त्यात अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत.लसीकरणासाठी २१ श्रीमंत तरुण - तरुणींची बनावट ओळखपत्र तयार केली होती. त्यामध्ये तब्बल १९ जणांना सुपरवायझर, तर दोन जणांना अटेंडंट म्हणून असल्याचे ओळखपत्र दिले होते. यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचे ओळखपत्र चौकशी समितीच्या चौकशीमध्ये उघड झाले आहे. परंतु, तिने लस घेतली नसल्याचेदेखील स्पष्ट झाले आहे. ज्यांनी लस घेतली आहे त्या सर्वांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी शिफारस केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामुळे आता आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे दोषींवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस