शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

ठाण्यातील झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात; नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 23:43 IST

प्रशासनाला मिळाला मोठा दिलासा, जनजागृती ठरली फायदेशीर

- अजित मांडकेठाणे :   शहरातील बहुसंख्य झोपडपट्टी भाग हे कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. येथील ८० टक्के नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आवाहनाला झोपडपट्टीतील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळेच सुनियोजित वसाहतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात यश आले आहे. मुंब्रा, वागळे, लोकमान्यनगरसह सहा नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसराची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. 

शहरात १३ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. मुंब्य्रासह इतर झोपडपट्ट्यांमध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. प्रादुर्भाव रोखायचा कसा, असा प्रश्न महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासमोर होता. आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ही जबाबदारी नागरी आरोग्य केंद्रांवर सोपविली. या केंद्रांमधील आरोग्य अधिकारी व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जनजागृती सुरू केली. प्रत्येक घरामध्ये व घरातील प्रत्येक सदस्यापर्यंत जनजागृती केली.

नियमांचे पालन केले, तर कोरोना नियंत्रणात ठेवता येईल, हे प्रत्येक नागरिकाच्या मनावर बिंबविले. आवाहन करून जे ऐकत नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली. यामुळे कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली. तसेच प्रत्येक झोपडीच्या ठिकाणी जाऊन सर्व्हे के. काही ठिकाणी फीव्हर क्लिनिकही सुरू केली, जी आजही सुरू आहेत. त्यामुळेच सुरुवातीच्या काळात सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या झोपडपट्टीमधील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास सुरुवात झाली.

झोपडपट्टी परिसरात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. शुक्रवारी वागळे समितीमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर मुंब्रा आणि दिवा परिसरात १२ रुग्ण आढळले. मुंब्रा परिसरात सर्वात कमी २४ रुग्ण आहेत. दिवा व वागळे परिसरात अनुक्रमे ३३ व ५१ रुग्ण शिल्लक आहेत. सर्वात दाट लोकसंख्या असलेल्या लोकमान्यनगरातही हा आकडा ८७वर आला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे