शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ठाणे जिल्ह्यात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 05:13 IST

दिवसभरात सापडले ७१० रुग्ण

ठाणे  : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ७१० रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख २२ हजार ९१२ बाधित रुग्ण झाले असून दिवसभरात दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ५९२ झाली आहे. यामुळे कोरोना टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाण्यात १९६ रुग्ण आढळले असून शहरात आता ४९ हजार ७६९ रुग्ण नोंदले गेले आहेत, तर तीन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार २१२ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत १४९ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू झाला आहे. या शहरात ५२ हजार ५३३ बाधित झाले असून एक हजार ४० मृत्यू झाले आहेत. उल्हासनगरमध्ये २१ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही.भिवंडीला १६ बाधित आढळले असून एकही मृत्यू नाही. मीरा-भाईंदरमध्ये ४४ रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथमध्ये १९ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू झाला नाही. बदलापूरला ४२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित सात हजार ७९९ झाले आहेत. या शहरात मृत्यू न झाल्यामुळे ९८ मृत्यू कायम आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५४ रुग्णांची वाढ झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. येथील १७ हजार ७३७ बाधितांसह ५५९ मृतांची नोंदणी झाली आहे.

रायगड जिल्ह्यात ८५ रुग्णांची नोंदरायगड : जिल्ह्यात शनिवारी ८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ५६ हजार ०७१ वर पोचली आहे. आतार्पयत एकूण १५९३ जणांना मृत्यूने कवटाळले आहे तर, आतार्पयत ५३ हजार५९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली.नवी मुंबईत१६९ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात शनिवारी दिवसभरात १६९ रुग्ण वाढले असून ९१ बरे झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या ४६,९५६ झाली असून त्यापैकी ४४,६५९ जण बरे झाले आहेत. शिल्लक रुग्णांची संख्या १,३४० वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला आहे. वसई-विरारमध्ये५२ नवे रुग्णवसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात ५२ रुग्ण नव्याने आढळून आले असून ४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर अजूनही ४३४ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या