शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळेच शहरात कोरोना फोफावला, स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 20:04 IST

शहरात वाढत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येवरुन आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार आगपाखड केली. प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळेच कोरोनाचे संकट झोपडपटटी भागात आणखी गडद होत असल्याचा आरोपही यावेळी सदस्यांनी केला

ठाणे : झोपडपटटी भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या हायरीस्कमधील आणि लो रिस्कमधील नागरीकांना तत्काळ क्वॉरान्टाइन करण्यात अपयश, सार्वजनिक शौचालयांची सफाई दिवसातून तीन वेळा होणे अपेक्षित असतांना त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे, रुग्णांची तपासणी करुन त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, एखादा रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कातील नागरीकांना ठेवण्यासाठी महापालिकेकडे जागा नाही, ताप आलेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार मिळत नाहीत, असे अनेक ठपके ठेवत स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या नियोजनशुन्य कारभाराची चिरफाड केली. पालिकेच्या दुर्लक्षामुळेच झोपडपटटीत कोरोना फोफावला असल्याचा आरोपही यावेळी नगरसेवकांनी केला.                       ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बुधवारी दुपारी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या कोरोनाच्या काळातील कमी पडलेल्या उपाय योजनांची चांगलीच चिरफाड केली. ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसात कोरोनाच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. झोपडपटटी भागात तर कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे, लोकमान्य नगर, मुंब्रा, माजिवडा मानपाडा, वागळे इस्टेट, कळव्यातील झोपडपटटी या भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यावरुनच सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. झोपडपटटी भागात एखादा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील हायरीस्क आणि लो रिस्कमधील सर्वांना तत्काळ क्वॉरान्टाइन करणे अपेक्षित असते, मात्र तसे होत नसल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य हणमंत जगदाळे यांनी केला. त्यांना ठेवण्यासाठी पुरसे क्वॉरान्टइन केंद्रेही कमी असल्याचे त्यांनी सांगितले. झोपडपटटी भागात सार्वजनिक शौचालये हा कोरोना वाढीचे कारण असू शकते, परंतु त्याठिकाणी दिवसातून तीन वेळा सफाई होणे अपेक्षित असताना त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ताप आलेल्या रुग्णांवर देखील पालिकेच्या कळवा रुग्णालयात उपचार होत नसल्याची धक्कादायक बाब त्यांनी यावेळी उघडकीस आणली. दुसरीकडे खाजगी रुग्णालयांकडून सुरु असलेल्या लुटीच्या विरोधात संजय भोईर यांनी आवाज उठवत, सर्वसामान्य रुग्ण या रुग्णालयात गेला तर त्याला आधी ५० हजार ते १ लाख डिपॉझीट करायला सांगितले जाते हे कधी थांबणार, पीपीई कीटचे आधीच नियोजन, हॉस्पीटलचे नियोजन आधी करणे अपेक्षित होते. मात्र त्यातही पालिका कमी पडली आहे. फायलेरीया विभागातील साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पिळवणुक सुरु आहे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोरोनाच्या या काळात डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार आदींसह इतर महत्वाचे शासकीय कर्मचारी काम करीत आहेत, त्यामुळे त्यांच्या रक्षणासाठी ५० लाखांचा आरोग्य विमा काढण्याची मागणी सदस्य कृष्णा पाटील यांनी केली. दरम्यान दुपारी १ वाजता सुरु झालेल्या स्थायी समितीची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. त्यामुळे प्रशासन आता याबाबत काय उत्तर देणार याची उत्कंठा मात्र शिगेला गेली आहे..

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या