शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकर नागरिकांनो सावधान, कोरोनाने केले डोकेवर; दिवसभरात शहरात एका मृत्यूची नोंद

By अजित मांडके | Updated: March 16, 2023 21:31 IST

 सक्रिय रुग्णांची संख्या शंभराच्या पार

ठाणे: शनिवार आणि सोमवारनंतर पुन्हा एकदा गुरुवारी ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने उसळली घेतली आहे. आजच्या दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये २८ रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले आहेत. तर शहरात एका मृत्यू ची नोंद झाली आहे. कळवा रुग्णायलात उपचार सुरू होते. त्याचे वय अंदाजे ८० च्या पार असल्याची माहिती पालिकेने दिली. तर आठवड्यात वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे आता सक्रिय रुग्णांचा आकडा शंभराच्या पार गेला आहे. तर निम्म्याहून अधिक सक्रिय रुग्ण ठामपा हद्दीत उपचारार्थ दाखल आहेत. तर एकूण सक्रिय रुग्णसंख्या ही १३३ झाली आहे . 

शनिवारी (११ मार्च) जिल्ह्यात १६ रुग्ण तर सोमवारी (१३ मार्च) १३ रुग्ण नोंदवले गेले. त्यानंतर बुधवारी (१५ मार्च) २४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येने सक्रिय रुग्णांची संख्या ही चांगलीच वाढली होती. ती संख्या आता १३३ इतकी झाली आहे. ठामपा हद्दीत गुरुवारी २८ नोंदवलेल्या नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्ण संख्या ८५ वर गेली आहे. तर शहरात एका मृत्यू ची नोंद झाली आहे. कल्याण डोंबिवली येथे ०३ रुग्ण सापडला असून सक्रिय रुग्णांची संख्या ११ झाली आहे. नवी मुंबईत ७ रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रुग्ण संख्या १७ इतकी झाली आहे.

उल्हासनगर येथे ० रुग्ण नोंदवला गेला असून सक्रिय रुग्ण संख्या २ आहे. भिवंडी ०१ रुग्ण आढळून आला आहे. सक्रिय रुग्ण संख्या २ आहे. मीरा भाईंदर येथे शून्य रुग्णाची नोंद झाली  असून सक्रिय रुग्ण संख्या ३ झाली आहे. कुळगाव बदलापूर मध्ये शून्य रुग्णाची नोंद असून सक्रीय रुग्ण ही एकच आहे.मात्र ठाणे ग्रामीण मध्ये ०१ रुग्ण सापडल्याने सक्रिय रुग्ण ही १२ इतकी झाली आहे अशी माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. रुग्ण संख्या वाढत असल्याने ठाणे कर नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचा कटाक्षाने पालन करावे असे आवाहन ही केले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे