शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची सर्रास वर्दळ; बहुतांश दुकाने सताड उघडी, नेहमीप्रमाणे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 02:09 IST

कोरोना वाढण्याची भीती : नागरिकांचे गांभीर्य झाले कमी, कोरोनामुळे पालिकांनी शहरांत कंटेनमेंट झोन तयार करून निर्बंध घातले होते. पण, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताच तेथील व्यवहार टप्प्याटप्प्यांनी सुरळीत होऊ लागले आहेत. असे असले तरी निर्बंधांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत दुकाने, व्यवहार सुरू झाले आहेत. या झोनमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याचा आढावा ‘लोकमत’ने घेतला आहे.

अजित मांडके। धीरज परबठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार, शहरातील ३९ हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमधील ३९ भागांतील गणेशभक्तांना घरीच बाप्पांचे विसर्जन करावे लागणार आहे. तसेच त्यांच्यासाठी फिरते गणेश विसर्जन वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर, या भागांतील मेडिकल आणि दूधविक्र ी सुरू असून इतर व्यवहार बंद आहेत. असे असले तरी या भागातील नागरिक इतर भागांत जात आहेत. तसेच गणरायाच्या मूर्तीही त्यांनी इतर भागातून आणल्या आहेत. बाप्पांच्या खरेदीसाठी व इतर कामांसाठी नागरिक बाहेर जात आहेत. काही ठिकाणी शहरात ३९ हॉटस्पॉट आजही कायम ठेवण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात गर्दी करू नये, गणपती आणण्यासाठी जातानाही काळजी घ्यावी, असे आवाहनही पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले होते. पालिकेने शहरातील काही भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. ३९ पैकी २४ हॉटस्पॉट हे झोपडपट्टी भागात आहेत. तर, १५ हॉटस्पॉटही इमारतींच्या ठिकाणी आहेत. इमारतींच्या ठिकाणी आळा घालणे शक्य आहे.

परंतु, झोपडपट्टी भागात आळा घालणे कठीण असल्याने पालिकेने येथील नागरिकांना आधीच खरबदारीच्या सूचना दिल्या आहेत. या ३९ हॉटस्पॉटमध्ये कळवा प्रभाग समितीमधील काही भाग, वागळे, लोकमान्यनगर-सावरकरनगर, नौपाडा, उथळसर, माजिवडा- मानपाडा, वर्तकनगर प्रभाग समिती आदी ठिकाणांच्या भागांचा समावेश आहे. या ठिकाणी कोरोनाचे रु ग्ण आजही वाढताना दिसत आहेत. त्यामुळे या ३९ हॉटस्पॉटमधील गणेशभक्तांनी गणरायाचे घरच्याघरीच विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील दुकाने व इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. मानपाड्यातील काही भाग, ढोकाळी, कळवा, लोकमान्यनगर, वागळे, नौपाडा आदींसह इतर महत्त्वाच्या हॉटस्पॉटमधील नागरिकांनी इतर भागात येजा सुरूच ठेवली आहे.मीरा-भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन

भाईंदर महापालिकेने २१ आॅगस्टपर्यंत दिलेल्या माहितीनुसार शहरात सहा ठिकाणी हॉटस्पॉट जाहीर केलेले आहेत. परंतु, हॉटस्पॉट केवळ कागदावरच असून या बहुतांश हॉटस्पॉटमध्ये घालून दिलेल्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे आढळून आले आहे, जेणेकरून कोरोना संसर्गाचा धोका आणखी वाढला आहे. स्थानिक नगरसेवक, पालिका व पोलीस प्रशासन यांच्या प्रभाग समितीनुसार तयार केलेल्या दक्षता समित्या केवळ दिखावा ठरल्या आहेत.

मीरा-भार्इंदरमध्ये आता कोरोना रु ग्ण ज्या परिसरात जास्त आढळून येतील, त्या परिसरास आता कंटेनमेंट झोनऐवजी हॉटस्पॉट असे महापालिकेकडून म्हटले जात आहे. हॉटस्पॉटवगळता शहरात अन्यत्र सर्व दुकाने आदी खुली करण्यास पालिकेने परवानगी दिलेली आहे .हॉटस्पॉट भागात निर्बंध असले, तरी येथेदेखील सर्रास सर्व दुकाने-व्यवहार खुले केले जात आहेत. या भागात नागरिकांची वर्दळ, घोळक्याने जमणे, मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे आदी सर्व प्रकार उघडपणे सुरू आहेत. नागरिक नाहक फिरताना दिसत आहेत.

कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना, जबाबदाऱ्या स्थानिक नगरसेवक, पालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त अशा प्रभाग समिती दक्षता समित्यांना दिलेल्या आहेत. हॉटस्पॉटमध्ये घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करण्याची जबाबदारीही याच दक्षता समित्यांची आहे. परंतु, या दक्षता समित्या केवळ कागदावरच काम करत आहेत. सध्या पालिकेने जाहीर केलेल्या हॉटस्पॉटमध्ये मीरा रोडच्या शांती पार्कमधील परिसर, रामनगर-शांती गार्डनचा परिसर, दहिसर चेकनाका ते महाजनवाडीतील परिसर, भार्इंदरची सेकंडरी शाळा ते मनोरमा-राणी सती परिसर, धावगी परिसर व बालाजीनगर परिसराचा समावेश आहे. परंतु, या हॉटस्पॉटमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेले हॉटस्पॉटसाठीचे निर्बंध-निर्देश मात्र पाळले जात नाहीत. मुळात, हा भाग हॉटस्पॉट आहे का, असा येथील प्रत्यक्ष वर्दळ पाहता प्रश्न पडतो. या हॉटस्पॉटमध्ये कोणत्या गोष्टी बंद आहेत व कोणत्या गोष्टींना परवानगी दिली आहे, हेच त्यात्या भागांतील लोकांना माहीत नाही. पालिकेनेही तशी जनजागृती केलेली नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस