शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

ग्रामीण भागातूनही कोरोना होतोय हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:04 IST

३८४ रुग्णांवर उपचार सुरू; १७, ५७१ रुग्णांची मात

n  लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ग्रामीण भागातील १८ हजार ५२९ रुग्णांपैकी १७ हजार ५७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत येथे ५७४ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अवघी ३७४ आहे. त्यामुळे ग्रामीण भागदेखील कोरोनामुक्तीकडे झपाट्याने वाटचाल करताना दिसत आहे. ग्रामीण भागात तब्बल २४०२ कंटेनमेंट झोन होते. त्यापैकी आता १०८ कंटेनमेंट झोन सुरू असून उर्वरित ठिकाणचे व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने ग्रामीण भागासाठी ही दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंबर कसली. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासकीय व खासगी रुग्णालयांमध्येही विशेष व्यवस्था करण्यात आली. मात्र, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेल्याने यंत्रणेवरील ताण वाढला होता. अशा परिस्थितीतही जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन रुग्णांचे जीव वाचवले. त्याची फलश्रुती ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस रुग्णसंख्येत होणारी घट, रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण आणि रुग्णालयातील रिकाम्या खाटांच्या रूपात दिसून येत आहे. दिवाळीनंतर रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. उलट डिसेंबरमध्ये ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले.दरम्यान, जिल्ह्यातील सहा महापालिकांसह शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण आणि भिवंडी या पाच तालुक्यांतील ग्रामीण क्षेत्रात १६ डिसेंबरपर्यंत १८ हजार ५२९ इतकी रुग्णसंख्या आहे. त्यातही १०९६ रुग्ण हे शेद्रुण व म्हसा येथील आहेत. ग्रामपंचायत नसलेल्या कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील रुग्ण (निळजे-बदलापूर) ५४११ आणि उर्वरित ठाणे ग्रामीणमधील १२,०२२ रुग्णांचा त्यात समावेश आहे. त्यातील १७ हजार ५७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात ५७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तपशील     एकूण रुग्ण    अंबरनाथ    कल्याण    भिवंडी    शहापूर    मुरबाडएकूण रुग्ण    १८५२९    १७९०       ५२८२      ६९९८    ३३२६    ११३३बरे झालेले     १७५७१    १७०८    ४९१८      ६६९७    ३१७५    १०७३उपचार सुरू    ३८४    १९    २४३         ८३        ३२        ०७एकूण मृत्यू    ५७४    ६३    १२१       २१८       ११९        ५३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या