शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कोपर पुलाचे काम तीन महिन्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 01:32 IST

डोंबिवलीचा कोपर पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिक आणि वाहनचालक वाहतूककोंडीच्या चक्रात अडकले आहेत.

कल्याण : डोंबिवलीचा कोपर पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिक आणि वाहनचालक वाहतूककोंडीच्या चक्रात अडकले आहेत. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर विनीता राणे यांनी रेल्वेच्या डीआरएमसोबत चर्चा केली होती. या चर्चेअंती पुलाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा दावा स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. तसेच, हा पूल पूर्णत: तोडावा लागेल, असा गैरसमज पसरवला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोपर पूल रविवारपासून वाहतुकीसाठी बंद केला आहे. पर्यायी वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवली आहे. हा पूल अरुंद असल्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. रेल्वेसोबत झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी महापौर राणे यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.म्हात्रे म्हणाले की, पूल पूर्णपणे तोडावा लागणार असा गैरसमज पसरविला जात आहे. प्रत्यक्षात पुलावरचा स्लॅब तोडून तेथे नवा स्लॅब टाकायचा आहे. हे काम तीन महिन्यांत होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला जाणार आहे. पुलावरील महावितरणच्या वीज वाहिन्या हटवण्यासाठी जो खर्च अपेक्षित आहे, तो जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केला जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत राज्यमंत्र्याची बैठक झाली होती. त्याचा अहवाल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सादर करत वीज वाहिन्या हटवण्याचा खर्च जिल्हाधिकारी कधी महापालिकेस देणार, असा सवाल केला. वीज वाहिन्या हटवल्यानंतर प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात होईल. मात्र, वीज वाहिन्या हटवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेला नाही. महावितरण हे काम करणार नसेल तर त्यांच्याविरोधात कठोर पावले उचणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. राज्यमंत्र्यांनी रस्त्यासाठी ४०० कोटी मंजूर केले आहेत. त्यापैकी काही कोटी या कामासाठी वळवले जावेत. पुलासाठी आठ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुलाचे डिझाइन दहा दिवसांत अंतिम करण्यात येईल. निविदा प्रक्रिया न करताच हे काम केले जाणार आहे.>‘ठाकुर्ली रेल्वे फाटक सुरू करा’कल्याण : डोंबिवलीचा कोपर रेल्वे उड्डाणपूल रविवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, रेल्वेने पर्यायी वाहतुकीचा पर्याय दिलेला नाही. त्यांनी ही जबाबदारी महापालिका व वाहतूक पोलिसांवर ढकलली आहे. हा पूल बंद करण्याच्या हालचाली चार महिन्यांपूर्वीच सुरू झाल्या. त्याचवेळी ठाकुर्ली येथील बंद केलेले रेल्वे फटाक पुन्हा सुरू करण्याची मागणी शिवसेनेने रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र, रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे, याकडे शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. कोपर उड्डाण पुलाच्या कामासंदर्भात रेल्वेने नियोजन केलेले नाही. रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेस नोटीस पाठवून आपण कसे नामानिराळे आहोत, याची प्रचिती दिली आहे. रेल्वे पुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापलिकेने रेल्वेला आतापर्यंत चार कोटी ९५ लाख रुपये दिले आहेत. मग रेल्वे कसली देखभाल दुरुस्ती केली, असा सवाल शिवसेनेने केला होता. कोपर पूल बंद केल्याने वाहतूक आता ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलावरून वळविली आहे. मात्र हा पूल वाहतुकीसाठी अरुंद आहे. डोंबिवली पश्चिमेतून पूर्वेला जाणाºया स्कूलबस व अन्य वाहने या पुलावरील वाहतूककोंडीत अडकण्याची भीती आहे. त्यामुळे येथील कोंडी टाळण्यासाठी रेल्वेने ठाकुर्ली येथील रेल्वे फाटक पुन्हा वाहतुकीसाठी खुले करावे. कोपर पुलाचे काम होईपर्यंत ही सुविधा द्यावी, असे मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, रेल्वेने त्याचा विचार केलेला नाही. त्यामुळे हे फाटक खुले करावे, अशी मागणी आता म्हात्रे यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.>दाव्याबाबत साशंकता : म्हात्रे यांनी तीन महिन्यात काम पूर्ण करण्याचा दावा केला असला तरी पुलाच्या कामाचे डिझाइन मंजूर होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे हे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा दावा कितपत खरा ठरणार, असा प्रश्न आहे. कारण, पत्री पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पत्री पुलाचे काम डिसेंबर २०१८ मध्ये सुरू झाले. हे काम फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण होणार आहे, असे राज्य रस्तेविकास महामंडळाने सांगितले.