शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी वाहने, स्कुल बसेस आणि १० टिएमटीच्या मिडी बसेसची अ‍ॅम्ब्युलेन्समध्ये रुपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 14:39 IST

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता कोरोना बाधीत रुग्णांना घेऊन जाण्यासाठी खाजगी वाहने, स्कुल बसेस आणि टीएमटीच्या आणखी १० मिडी बसेसचे रुपांतर अ‍ॅब्युलेन्समध्ये करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आता रुग्णांना वेळेत अ‍ॅम्ब्युलेन्स मिळतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

ठाणे : कोरोना बाधीत रुग्णांना अ‍ॅम्ब्युलेन्स मिळत नाहीत अशी ओरड सर्वांचीच होती, किंबहुना रुग्णांचे हालही या ठाण्याने पाहिले आहेत. परंतु आता तीनही परिमंडळांसाठी महापालिकेने अ‍ॅम्ब्युलेन्सची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता त्या पुढे जाऊन १० खाजगी वाहने, ७ स्कुल बसेस आणि आणखी १० टिएमटीच्या मिडी बसेसचे रुपांतर अ‍ॅम्ब्युलेन्समध्ये करण्यात आले आहेत. त्यासाठी एका समन्वय अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात आली असून टीएमटीचा स्टाफही यासाठी कामासाठी नेमण्यात आले आहेत.            मागील काही दिवसापासून शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, रुग्णांना वेळेत अ‍ॅम्ब्युलेन्स न मिळणे, अ‍ॅम्ब्युलेन्स अभावी रुग्णांची मृत्यु होणे, या मुद्यावरुन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली होती. अखेर महापालिकेने कंत्राटी स्वरुपात अ‍ॅम्ब्युलेन्स घेण्याचा निर्णय घेतला आहे. तीन परिमंडळाअंतर्गत १० ते १५ अ‍ॅम्ब्युलेन्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आता या पुढे जाऊन पालिकेने १० खाजगी वाहने यामध्ये छोट्या मोठ्या वाहनांचा समावेश आहे. तर ७ स्कुल बसेस आणि आणखी १० टीएमटीच्या मिडी बसेसही आता अ‍ॅम्ब्युलेन्ससाठी वापरल्या जाणार आहेत. यापूर्वी १० बसेसचे रुपातंर अ‍ॅम्ब्युलेन्समध्ये करण्यात आले आहे. त्यानंतर आता आणखी १० बसेस उपलब्ध होणार आहेत. ज्यांना कोरोनाची अधिकची लक्षणे नसतील त्यांच्यासाठी या अ‍ॅम्ब्युलेन्स उपयुक्त ठरतील असा दावा महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी केला आहे. यासाठी अतिरिक्त चालकांचीही नेमणुक केली जाणार असून, १२ -१२ तासांसाठी चालकांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. तसेच त्यांच्या सुरक्षेसासाठी देखील उपाय योजना केल्या जाणार आहेत.यासाठी एका समन्वय अधिकाºयाची नेमणुक केली जाणार आहे. त्याच्याकडून या अ‍ॅम्ब्युलेन्सचे नियोजन केले जाणार आहे. शिवाय या अ‍ॅम्ब्युलेन्सचे नियोजन करण्यासाठी परिवहन सेवेतील नियोजन पाहणाºया अधिकाºयांची यासाठी नेमणुकही केली जाणार आहे. एकूणच आता मागील काही दिवसापासून सुरु असलेली ओरड आता बंद होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या