शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

भाजपाने शिवजयंतीनिमित्त मीरारोडमध्ये लावलेल्या बॅनर वरून वादंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 23:03 IST

भाजपाचे अहमदनगर महापालिकेतील उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन तीव्र निषेध व्यक्त होऊन छिंदमला अटक झाली असल्याची घटना ताजी असतानाच मीरा भाईंदरमध्ये भाजपाने शिवजयंती निमित्त लावलेल्या बॅनर वरून वादंग निर्माण झाला.

मीरा रोड -  भाजपाचे अहमदनगर महापालिकेतील उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन तीव्र निषेध व्यक्त होऊन छिंदमला अटक झाली असल्याची घटना ताजी असतानाच मीरा भाईंदरमध्ये भाजपाने शिवजयंती निमित्त लावलेल्या बॅनर वरून वादंग निर्माण झाला. मनसे, मराठी एकीकरण समिती, रिपब्लिकन सेना, शिवमावळा संस्था आदींनी भाजपाच्या बॅनरवर महाराजांना चक्क काही वादग्रस्त पदाधिका-यांच्या सोबत एकाच रांगेत स्थान दिल्याने निषेध करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. वाढता तणाव पाहून पोलिसांनी भाजपाचे वादग्रस्त बॅनर काढायला लावले. 

भाजपाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देणारा लांब आकाराचा बॅनर हा मीरा रोडच्या सिल्वर पार्क जंक्शनवर अनधिकृत म्हणून तोडलेल्या इमारतीवर लावण्यात आला होता. या बॅनरवर एका ओळीने पंतप्राधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नरेंद्र मेहता, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, महापौर डिंपल मेहता, नगरसेवक अरविंद शेट्टी, भाजपाचे संजय थरथरे व फिरोज शेख यांची छायाचित्र असून महापौर व शेट्टी यांच्या छायाचित्रादरम्यान शिवाजी महाराजांचे छायाचित्र आहे. 

या बॅनर बद्दल रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहित आसले, शिवमावळाचे नामदेव काशिद, राजेश जाधव, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, मनसेचे दिनेश कनावजे, सचिन पोपळे आदींनी आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत असताना त्यांना भाजपाच्या काही वादग्रस्त पदाधिकाऱ्यांच्या रांगेत बसवणे हा महाराजांचा अवमान असून तो कदापी सहन करणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला . 

नगरसेवक अरविंद शेट्टीचे तर ऑक्रेस्ट्रा बार-लॉज असून वेश्या व्यवसायप्रकरणी पीटा सह अन्य गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. आमदार मेहता, थरथरे, शेख आदी वादग्रस्त असून त्यांच्यावर देखील गुन्हे तसेच तक्रारी आहेत. अशा वादग्रस्तांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या रांगेत महाराजांचे छायाचित्र टाऊन त्यांचा अपमान केला गेला आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मराठी एकीकरण समिती, रिपब्लिकन सेनेने या बॅनरप्रकरणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

बॅनरमुळे महाराजांचा अवमान झाला असून आमच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपाला महाराज केवळ निवडणूक जिंकण्या पुरते आणि राजकीय स्वार्थासाठी लागतात. पण त्यांचा सन्मान आणि आदर न राखता उलट अवमान केला जात असल्याचे एकीकरणचे देशमुख म्हणाले. 

बॅनर काढण्यावरून आंदोलक व नगरसेवक शेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक झडली. आंदोलकांनी शेट्टीवर कारवाई करा असे सांगत ही सत्तेची मस्ती असल्याचे सुनावले . मीरारोड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तो वादग्रस्त बॅनर काढायला लावला. बॅनर बनवणा-याकडून चूक झाली आहे . महाराजांचा आपणास आदरच आहे. पण हे चुकून झाल्याचे झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले. तर बॅनर काढण्यात आला असून आलेल्या तक्रारी वर योग्य ती कार्यवाही करू असे मीरारोडचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत लब्धे यांनी सांगितले. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज