शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

भाजपाच्या बेकायदा फलकावरून उफाळणार वाद

By admin | Updated: March 23, 2017 01:23 IST

भाजपा आमदार नरेंद्र मेहता प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेचा नामफलक पालिका मुख्यालयाबाहेर बेकायदा लावण्यात आला

भार्इंदर : भाजपा आमदार नरेंद्र मेहता प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेचा नामफलक पालिका मुख्यालयाबाहेर बेकायदा लावण्यात आला आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. पालिका इतर संघटनांच्या नामफलकाला परवानगी दिली जात नसल्याने त्यांनीही तेथे फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नामफलक ावरून वाद होण्याची शक्यता आहे. मेहता यांनी कर्मचाऱ्यांच्या पतपेढीवर सत्ता मिळविण्यासाठी २०१६ मध्ये मीरा-भार्इंदर श्रमिक जनरल कामगार संघटना स्थापन केली. या संघटनेचा नामफलक पालिकेची कोणतीही परवानगी न घेता मुख्यालयाबाहेर लावण्यात आला. त्याचे उद्घाटनही कामगार मंत्र्यांच्याच हस्ते झाले. यावर पालिकेने कोणताही आक्षेप न घेता बेकायदा फलकाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक महिन्यांपासून पालिकेकडे इतर कामगार संघटनांनी परवानगी मागितल्यानंतरही त्यांना प्रशासनाने परवानगी नाकारली. तसेच त्यांना संघटनेचा नामफलक लावण्यासही मनाई केली. मग भाजपा प्रणित संघटनेचा नामफलक प्रशासनाच्या लक्षात येत नाही का, असा सवाल इतर संघटनांनी उपस्थित केला आहे. यामुळे नामफलकावरुन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेत भाजपा-सेना युतीची सत्ता आहे. यातील सेनेची मीरा-भार्इंदर कामगार सेना अनेक वर्षांपासून कार्यरत असतानाही पालिकेने या संघटनेच्या नामफलकाला परवानगी दिलेली नाही. मात्र भाजपाच्या दबावाखाली प्रशासन कारभार चालवित असून सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाच्या मनाई आदेशाला झिडकारुन आपापल्या संघटनांचेही फलक लावण्यासाठी अन्य कामगार संघटना पुढे सरसावल्या आहेत. (प्रतिनिधी)