शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त पवार केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 00:39 IST

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त सु.रा. पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

कल्याण : केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त सु.रा. पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. आयुक्त गोविंद बोडके यांनी ही जबाबदारी सोपवली असून, या आदेशाची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात करावी, असेही आदेशात म्हटले आहे.उपायुक्त पवार यांच्याकडे अनधिकृत बांधकाम विभाग होता. अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना बेकायदा बांधकामप्रकरणी लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तपद जूनपासून रिक्त होते. आयुक्तांनी पवार यांना या पदाची जबाबदारी देताना उपायुक्तपदही सांभाळावे, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी आता महिला-बाल कल्याण, शिक्षण विभाग, वैद्यकीय आरोग्य विभाग, क्रीडा व सांस्कृतिक विभाग हे चार विभाग पाहावा लागणार आहे.या विभागांतील आर्थिक बाबींशी निगडीत सर्व प्रस्ताव व प्रकरणे मंजुरीसाठी आयुक्त, स्थायी समिती सभापती, महासभा, लेखा परीक्षक व लेखा अधिकारी यांच्या परवानगीनंतरच सचिवांकडे पाठवावेत, असेही आदेशात नमूद केले आहे.मात्र, पवार यांच्याकडे दिलेला पदभार हा अतिमहत्त्वाच्या विभागांचा नाही. तसेच पवार हे तीन महिन्यांनतर निवृत्त होणार आहेत. पवार यांना अतिरिक्त कार्यभाराचा वेगळा पगार दिला जाणार नाही. मात्र त्यांच्या सेवा पुस्तकात त्याची नोंद होणार आहे.>महत्त्वाची खाती का नाहीत? : पवार यांना अतिरिक्त आयुक्त पदाची वाढीव जबाबदारी देताना त्यांना महत्त्वाची खाती का दिली नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दहा वर्षांपूर्वी पवार हे मालमत्ता विभागात उपायुक्त पदावर कार्यरत असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यांना अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाकडे दाद मागितली होती. आयोगाच्या आदेशानंतर पवार यांना राज्य सरकारच्या आदेशानुसार पुन्हा महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेतले होते.