शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या वाचनालयाला दिली ग्रंथभेट; वाचकांनी केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:28 IST

सार्वजनिक वाचनालयाकडून तीन हजार पुस्तके

कल्याण : अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे तेथील जिल्हा नगर वाचनालयाचे मोठे नुकसान झाले होते. या वाचनालयाला कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने मदतीचा हात देत जवळपास तीन हजार पुस्तके नुकतीच भेट दिली आहेत. या पुस्तकांची किंमत जवळपास दोन लाख ७० हजार रुपये आहे.सांगली जिल्हा नगर वाचनालय हे १५० वर्षे जुने आहे. सांगली शहराला बसलेल्या पावसाच्या तडाख्यात या वाचनालयातील जवळपास ९० हजार पुस्तके खराब झाली. अशा वाचनालयास मदत करून वाचनसंस्कृती टिकून राहावी, याकरिता मदत करणे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून कल्याण सार्वजनिक वाचनालयाने कल्याणमधील वाचकांना आपल्याकडील जुनी पुस्तके वाचनालयात देण्याचे आवाहन केले होते. वाचकांनी त्याला प्रतिसाद देत आपल्याकडील जुनी-नवीन पुस्तके, संदर्भग्रंथ भेट म्हणून दिली.पवई येथील चैत्राली जोगळेकर, कवी विजय जोशी, डोंबिवलीच्या श्रद्धा वझे अशा जवळजवळ ६० वाचकांनी त्यांच्याकडील अडीच हजार पुस्तके तसेच सार्वजनिक वाचनालयांनी आपल्याकडील ५०० पुस्तके, अशी जवळपास तीन हजार पुस्तके वाचनालयास देणगी म्हणून दिली. या कामात वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, चिटणीस आशा जोशी, ग्रंथपाल गौरी देवळे, भिकू बारस्कर यांच्यासह अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले.पुस्तक दान करण्याचे आवाहनसांगलीतील महापुरामुळे जिल्हा वाचनालयाचा पहिला मजला पाण्यात होता. त्यामुळे हजारो ग्रंथ पाण्यात राहिल्याने खराब झाले. या ग्रंथालयाला आर्थिक मदतीबरोबर दुर्मिळ पुस्तकांचीही आवश्यकता आहे. त्यामुळे ग्रंथ दान करा, असे आवाहन ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाने केले आहे.मराठी ग्रंथसंग्रहालय स्वत: पाच हजारांहून अधिक पुस्तके देणार आहे. वाचकांनीही या ग्रंथालयाला मदत करण्यासाठी सुस्थितीतील पुस्तके, ग्रंथ, धार्मिक ग्रंथ, कोष इत्यादी ग्रंथसंपदा दान करावी. ही पुस्तके मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुख्य शाखेत सकाळी ९ ते रात्री ८ यावेळेत जमा करावीत.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूर