शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगार तीन महिने वेतनापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 00:02 IST

भिवंडी महापालिकेत पाणीपुरवठा विभागात व्हॉलमनचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्याचा पगार मिळालेला नाही.

अनगाव : भिवंडी महापालिकेत पाणीपुरवठा विभागात व्हॉलमनचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्याचा पगार मिळालेला नाही. या कामगारांना त्वरित पगार न दिल्यास तसेच संघटनेच्या सभासद कामगाराला कमी न करता नवीन कंत्राटात प्राधान्याने समाविष्ट करून घ्यावे तसे न केल्यास आयुक्तांच्या दालनासमोरच आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.१५ वर्षापासून पाणीपुरवठा विभागात व्हॉलमन, फिल्टर म्हणून काम करणाºया कामगारांना किमान वेतनानुसार वेतन मिळावे म्हणून श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन केल्यानंतर जून महिन्यात किमान वेतन मंजूर करण्यात आले. कामगारांना किमान वेतनानुसार वेतन मिळावे, ओळखपत्रासह इतर सोईसुविधा मिळाव्यात यासाठी तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्या सोबत २१ जून रोजी बैठक झाली होती. त्यावेळी जुलै महिन्यापासून कामगारांना किमान वेतन तसेच नवीन कंत्राटात संघटनेच्या कुठल्याही कामगाराला कमी न करता त्यांना समाविष्ट करण्यात येईल अशा सूचना पालिका अधिकाऱ्यांना हिरे यांनी दिल्या होत्या. त्यानंतरही कामगारांचा पगार मिळालेला नाही. तत्कालीन आयुक्त अशोककुमार रणखांब यांनाही निवेदन देऊन बैठक झाली होती. तेव्हाही आयुक्तांनी संघटनेची मागणी मान्य करत तशी सूचना कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता संदीप पटनावर यांना केली होती. मात्र त्याची अमलबजावणी अधिकाºयांनी केली नाही. त्यांच्या भेटी घेतल्यानंतर पाइपलाइन दुरूस्तीचे काम करणाºया कामगारांना दोन महिन्याचा पगार आॅगस्टमध्ये दिला. मात्र व्हॉलमन कामगांराना तीन महिन्याचा पगार मिळालेला नाही.दरम्यान, आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अधिकाºयांना पुन्हा आदेश द्यावेत, कामगांराचे वेतन त्वरित देण्यात यावे, कामगारांना नवीन कंत्राटामध्ये समाविष्ट करून घ्यावे आदी मागण्या संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे यांनी केली आहे.