शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाची कंत्राट प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात; अभियंता संघटनेची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:16 IST

गृहनिर्माण सोसायट्यांमधील पंप चालविण्याच्या कामासाठी काढलेल्या निविदेची वैधता संपल्यानंतरही म्हाडाने दिलेले कंत्राट वादाच्या भोव-यात सापडले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स इंजिनीअर्स असोसिएशनने या प्रकरणाची तक्रार म्हाडाच्या पदाधिकाºयांसह गृहनिर्माण मंत्र्यांकडेही केली आहे.

ठाणे : गृहनिर्माण सोसायट्यांमधील पंप चालविण्याच्या कामासाठी काढलेल्या निविदेची वैधता संपल्यानंतरही म्हाडाने दिलेले कंत्राट वादाच्या भोव-यात सापडले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स इंजिनीअर्स असोसिएशनने या प्रकरणाची तक्रार म्हाडाच्या पदाधिकाºयांसह गृहनिर्माण मंत्र्यांकडेही केली आहे.महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स इंजिनीअर्स असोसिएशनच्या लेखी तक्रारीनुसार, म्हाडाने १६ आॅक्टोबर २0१७ रोजी तीन निविदा उघडल्या होत्या. या निविदांची ९0 दिवसांची वैधता १४ जानेवारी २0१८ रोजी संपली. या वैध कालावधीमध्ये म्हाडाने कुणालाही निविदेचे काम दिले नाही. त्यानंतर कोणताही शासकीय आदेश किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमावलीमध्ये कोणतीही तरतूद नसताना म्हाडाने निविदेची वैधता आणखी ९0 दिवसांनी वाढवली. अशीच मुदतवाढ निविदा सादर करण्यासही देण्यात आली. निविदा प्रक्रिया जिवंत ठेवण्यासाठी संबंधित कंत्राटदाराशी मोठा व्यवहार झाला असावा, असा आरोप संघटनेने केला आहे.पंपांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी ते ‘तातडीचे काम’ असल्याचा अभिप्राय टाकून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या खर्चाच्या नोंदीही म्हाडाकडून सांभाळल्या जातनाहीत.म्हाडाच्या दुरुस्ती मंडळ आणि झोपडपट्टी सुधार मंडळाप्रमाणेच विद्युत विभागातही मोठ्या प्रमाणात अनागोंदी असून, एकाच कामाचे नाव बदलून दोन वेळा बिल काढण्याचे प्रकारही होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.निविदा सूचना संकेतस्थळावर नाही६२ हजार ५00 ते ३ लाख रुपयांपर्यंतची कामे साध्या निविदा प्रक्रियेद्वारे (ई-निविदा नव्हे) केली जातात. आधी या कामांसाठी वृत्तपत्रांमध्ये निविदा सूचना प्रसिद्ध करणे अनिवार्य होते. त्या वेळी अशा निविदा सूचना कुणाच्याही वाचण्यात येणार नाहीत, अशा वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्या जायच्या.सध्याच्या नियमानुसार कार्यकारी अभियंता किंवा निविदा जारी करणाºया अधिकाºयाने निविदा सूचना फलकावर लावणे अपेक्षित आहे. मात्र, निविदेची कोणतीही सूचना म्हाडा स्वत:च्या संकेतस्थळावर कधीच अपलोड करत नसून म्हाडामध्ये काय सुरू आहे हे सांगण्यासाठी हा प्रकार स्वयंस्पष्ट असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

टॅग्स :mhadaम्हाडा