शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर पालिकेच्या स्मशानभूमीत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपासून पगार नाही

By धीरज परब | Updated: April 29, 2024 21:05 IST

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या विविध स्मशानभूमी , दफनभूमीत काम करणाऱ्या ५३ कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्या पासूनचा पगारच ठेकेदाराने ...

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या विविध स्मशानभूमी , दफनभूमीत काम करणाऱ्या ५३ कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्या पासूनचा पगारच ठेकेदाराने न दिल्याने त्यांच्यावर हलाखीची पाळी आली आहे . सोमवारी अतिरिक्त आयुक्तांच्या दालना बाहेर खाली बसून कर्मचाऱ्यांनी पगार मिळवून देण्याचे साकडे घातले . 

मीरा भाईंदर महापालिकेची शहरात विविध स्मशानभूमी , दफनभूमी आहेत . त्या ठिकाणी आवश्यक असणारी कामे करण्या करता पालिकेने कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत . सदर कंत्राटी कमर्चारी शाईन ह्या ठेकेदार कंपनी मार्फत काम करतात . 

सदर ठेकेदाराने कंत्राटी कर्मचारी यांचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पगार एप्रिल संपला तरी दिलेला नाही . आधीच तुटपुंजा पगार व त्यात दोन दोन महिने पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे . घरखर्च व मुलांचा खर्च भागवण्यासाठी अनेकांना उसने पैसे घेण्याची वेळ आली आहे . 

कर्मचाऱ्यांना पगार न दिल्याने श्रमजीवी संघटनेच्या वतीने वसीम पटेल यांच्या सह कर्मचाऱ्यांनी सोमवारी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर यांची भेट घेऊन ठेकेदारास पगार देण्याचे निर्देश देण्याची विनंती केली . यावेळी मनोरकर यांनी तात्काळ ठेकेदारास कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचे निर्देश दिले . तर पटेल व कर्मचाऱ्यांनी देखील ठेकेदाराने पगार देण्याचे लेखी लिहून द्यावे अशी मागणी केली . 

ठेकेदार हा पालिके कडून सुमारे २० हजार रुपये प्रति कर्मचारी वेतन म्हणून घेतो . परंतु प्रत्यक्षात मात्र कर्मचाऱ्यास जेमतेम १३ हजार रुपयेच दिले जातात . ठेकेदाराने भविष्य निर्वाह निधी आदीची रक्कम सुद्धा भरलेली नाही . त्यामुळे अश्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावे , त्याची अनामत रक्कम जप्त करावी अशी मागणी वसीम पटेल यांनी केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर