शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता ४५ ते ४० हजारांची भरीव वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 20:37 IST

राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २६ जूनरोजी कंत्राटी डॉक्टरांच्या मानधन वाढीची मागणी देखील लावून धरली होती. यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले होते. कोकण विभागातील जिल्ह्यांसह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे, त्यांच्या जागी बीएएमएस पदवीधारक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प होते.

ठळक मुद्देराज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २६ जूनरोजी कंत्राटी डॉक्टरांच्या मानधन वाढीची मागणीएमबीबीएस कंत्राटी डॉक्टरांप्रमाणे बीएएमएस डॉक्टरांनाही ‘समान काम - समान वेतन’डावखरे यांनी आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले अखेर सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरूवारी शासन परिपत्रक जारी

ठाणे : राज्यातील कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणातील रूग्णालयांमध्ये,प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णांना सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता ४५ ते ४० हजारांची भरीव वाढ करण्यात आल्याचे कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. या मानधन वाढीसाठी सतत पाठपुरावा करून अखेर सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरूवारी शासन परिपत्रक जारी केल्याचेही त्यांनी निदर्शनात आणून दिले.यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २६ जूनरोजी कंत्राटी डॉक्टरांच्या मानधन वाढीची मागणी देखील लावून धरली होती. यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले होते. कोकण विभागातील जिल्ह्यांसह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे, त्यांच्या जागी बीएएमएस पदवीधारक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प होते. एमबीबीएस कंत्राटी डॉक्टरांप्रमाणे बीएएमएस डॉक्टरांनाही ‘समान काम - समान वेतन’ या तत्वावर मानधन देण्याची आवश्यकता आहे, असे निवेदनाव्दारे डावखरे यांनी आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले होते.राज्य सरकारने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (वर्ग अ) मानधनात वाढ केली आहे. त्यात एमबीबीएस डॉक्टरांचा उल्लेख आहे. मात्र, बीएएमएस डॉक्टरांचा उल्लेख केला नाही, याकडे डावखरे यांनी शिंदे यांचे लक्ष वेधले होते. याची दखल गांभीर्याने घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने आजच्या शासन परिपत्रकानुसार आदिवासी व दुर्गम भागात काम करणाºया डॉक्टरांना ४५ हजार रूपये, तर इतर भागात काम करणाºया डॉक्टरांना ४० हजार रूपये एवढे भरीव मानधन लागू केले आहे. यामुळे कोकण विभागातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील रु ग्णांना आता या डॉक्टरांकडू अधिक व उत्तम आरोग्य सुविधा देण्याची अपेक्षा डावखरे यांनी या डॉक्टरांकडून केली आहे.

टॅग्स :thaneठाणेdoctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्र