वासिंद : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेरा, शेई, अंबर्जे गावात सीमांकनाचे काम सुरू केले असून यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आधीची आंदोलने लक्षात घेता अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकासह इतर मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात आहे. या महामार्गासाठी येथील जवळ - जवळ शंभर सव्वाशे एकरच्या आसपास जमीन संपादित होणार असून यासाठी शेतकऱ्यांचा विरोध असतानाही पोलिसांच्या सहाय्याने सीमांकनाचे काम सुरू केल्याने सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याची खंत येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कृष्णा परटोले यांनी व्यक्त केली. सीमांकनात सर्वांना कळविले असून कुठलीही अडचण नाही, असे शहापूरचे तहसीलदार बाविस्कर म्हणाले. पूर्वपरवानगी व सूचना न देता जबरदस्तीने सीमांकन सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरल्याचे कोंडुराम बोटकोंडले म्हणाले.(वार्ताहर)
समृद्धीसाठी बंदोबस्तात सीमांकनाचे काम सुरू
By admin | Updated: March 22, 2017 01:31 IST