शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST

भिवंडी : शहरातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला काही दिवसांपासून गढूळ व मातीमिश्रित दूषित पाणी येत आहे. त्यामुळे ...

भिवंडी : शहरातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला काही दिवसांपासून गढूळ व मातीमिश्रित दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे महिला व मुलांसह नागरिकांना जुलाब - उलट्या यांसारखे आजार भेडसावू लागले आहेत. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. मनपा प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.

अंजूरफाटा, कामतघर, पारनाका बाजारपेठ, कासार आळी, कुंभार आळी, दर्गारोड, आझमीनगर, गौरीपाडा, शांतीनगर, बंगालपुरा, निजामपुरा, गैबीनगर, शांतीनगर, खंडूपाडा, गायत्रीनगर, घुंघटनगर अशा विविध कामगार लोकवस्ती असलेल्या भागात काही दिवसांपासून गढूळ व मातीमिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दूषित पाण्यामुळे अनेक महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम हाेत आहे. त्यातच सर्दी - खोकल्याची साथही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आरोग्याच्या समस्यांमुळे नागरिकांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे.

गटारातील पाण्यामुळे दूषित

शहरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ही मुख्य रस्त्यावरून, तर काही ठिकाणी गटारातून गेलेली आहे. सध्या शहरातील रस्त्यांना खड्डे पडल्याने या रस्त्यांतील नळाच्या फुटलेल्या पाईपलाईनमधून दूषित पाणी पालिकेच्या मुख्य प्रवाहातील जलवाहिनीत जात असल्याने हे पाणी दूषित हाेत आहे. याकडे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लक्ष द्यावे आणि नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी भिवंडी जनसंघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.