शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात कंटेन्मेंट झोन वाढले, मुंब्रा आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 16:15 IST

कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना शहरात कंटन्मेंट झोनची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यानुसार शहरात आजच्या घडीला २३५ कंटेन्मेट झोन असून १२ दिवसात ७८ ने यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

ठाणे : शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या जशी वाढत आहे. तसेच शहरातील कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढतांना दिसत आहे. ठाणे शहरात गेल्या १३ दिवसात झपाट्याने कोरोना रु ग्णाच्या संख्येत वाढ झाल्याने शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये ७८ ने वाढ झाली आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने अद्ययावत कंटेन्मेंट झोनची यादी जाहीर केली असून यामध्ये तब्बल २३५ झोनचा समावेश करण्यात आला आहे. १२ दिवसांपूर्वी हाच आकडा १६१ वर होता. ज्या प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये कंटेन्मेंट झोनची वाढ झाली आहे त्यात सर्वात आघाडीवर मुंब्रा त्यानंतर लोकमान्य नगर ,नौपाडा -कोपरी आणि वागळे प्रभाग समितीचा समावेश करण्यात आला असून हे सर्व झोपडपट्टीचा भाग असल्याने या भागात कंटेन्मेंटच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे मोठे आवाहन पालिका प्रशासनासमोर आहे.               ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या २८ दिवसात कोरोना रु ग्णांच्या संख्येत गुणाकार पद्धतीने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरात टेस्ट करण्याचे प्रमाण वाढले असल्याने रु ग्णसंख्या वाढत असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असला तरी ठाण्यासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी रु ग्णसंख्या वाढत आहे ते भाग कंटेन्मेंट झोन म्हणून प्रशासनाच्या वतीने घोषित करण्यात येत आहे. वागळे इस्टेट आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती रु ग्ण संख्येत आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या भागातील करोना संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे राहिले आहे. काही दिवसांपुर्वी शहरात ११३ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. त्यामध्ये ९७ इमारती आणि उर्वरीत झोपडपट्टी, चाळींच्या परिसराचा समावेश होता. मात्र, या संख्येत आता वाढ झाली असून शहरातील प्रतिबंधित क्षेत्राचा आकडा १६१ इतका झाला होता. यामध्ये मुंब्रा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्रात प्रत्येकी २६, सावरकर-लोकमान्यनगर प्रभाग समितीत २१, वागळे इस्टेट प्रभाग समितीत २०, नौपाडा प्रभाग समिती १७ प्रतिबंधित क्षेत्र असून हे सर्वच परिसर महापालिकेने जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीत आघाडीवर होते. गेल्या १२ दिवसांमध्ये मात्र या कंटेन्मेंट झोनमध्ये ७८ ने वाढ झाली असून यामध्ये मुंब्रा सर्वात आघाडीवर आहे. वारंवार घराबाहेर पडू नका असे आवाहन करूनही मुंब्य्रातील नागरिक ऐकत नसल्याने या ठिकणी रु ग्णसंख्या देखील वाढत असून कंटेन्मेंट झोनमध्ये देखील वाढ होत आहे. मुंब्य्रानंतर नौपाडा-कोपरी, लोकमान्य नगर ,माजिवडा, वागळे ,अशा प्रभाग समित्यांमधील झोनचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता नवीन आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांवर कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान आहे.प्रभाग समिती निहाय झोनची संख्या उथळसर - २१, माजिवडा -२७ वर्तकनगर - १३, लोकमान्य नगर - ३३, वागळे -२५, नौपाडा-कोपरी - ३५, कळवा - २६ मुंब्रा - ३९, दिवा - १६ असे एकूण २३५ कंटेन्मेंट झोन आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या