शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्लस्टरसाठी ठाणे पालिका नेमणार सल्लागार: पहिल्या टप्प्यात स्टेशन परिसरासह वागळे पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:07 IST

ठाणेकरांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अखेर लागू केली असून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणा-या ठाणेकरांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरक्षित घरे विनामूल्य मिळणार आहेत.

ठाणे : ठाणेकरांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अखेर लागू केली असून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणा-या ठाणेकरांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरक्षित घरे विनामूल्य मिळणार आहेत.या योजनेच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेने सुरुवात केली आहे. ठाणे स्टेशन आणि वागळे पट्टा या भागाचा आता पहिल्या टप्प्यात सामूहिक विकास केला जाणार आहे. या कामासाठी आवश्यक असलेल्या सल्लागारांची नेमणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार, आता सल्लागार नेमण्याचा प्रस्तावही पालिकेने तयार केला असून येत्या २० नोव्हेंबरच्या महासभेत तो मंजुरीसाठी ठेवला आहे. यासाठी पालिका एक कोटी १२ लाख ३५ हजार ७२० रुपयांचा खर्च करणार असून दोन संस्थांना हे काम विभागून देण्यात आले आहे.उच्च न्यायालयाने नुकताच योजनेला हिरवा कंदील दिल्यानंतर राज्य शासनाने याबाबतची अंतिम अधिसूचना जारी केली होती. या योजनेसाठी किमान ८ हजार चौरस मीटर भूखंडाची आवश्यकता असून क्लस्टरमध्ये झोपडपट्टी आणि अधिकृत इमारती असल्यास त्यांची कमाल मर्यादा अनुक्रमे २५ टक्के आणि ४० टक्के असणार आहे. क्लस्टर योजनेत ४ एफएसआयला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, पालिकेने आधीच त्या दृष्टीने क्लस्टरचा अभ्यास सुरू केला आहे.या वाढीव एफएसआयनुसार झोपडपट्टी भागाला अधिक फायदा होणार आहे. पालिका पुन्हा या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अर्बन रिन्युव्हल प्लान तयार करणार असून ही योजना कोणत्या भागात कशी राबवता येऊ शकते, याचा अभ्यास करणार आहे. तो करत असतानाच उर्वरित ठिकाणी क्लस्टर राबवण्यास सुरुवात करणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ठाणे स्टेशन परिसर आणि वागळे पट्टा यांची निवड केल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. त्यानुसार, स्टेशन परिसरात काही बदलदेखील करण्यास सुरुवात झाली आहे.परंतु, सध्या या दोन्ही भागांतील असलेली गजबज पाहता आणि नव्या सोयीसुविधा कशा पद्धतीने पुरवल्या जाऊ शकतात, याचा अभ्यास करणे पालिकेला थोड्याफार प्रमाणात कठीण होणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका