शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमध्ये बांधकामबंदी

By admin | Updated: February 8, 2017 03:55 IST

कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात अपयशी ठरल्याने मीरा-भार्इंदरमध्ये बांधकामबंदी लागू करण्याचा आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने ३ फेब्रुवारीला दिला आहे

मीरा रोड : कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात अपयशी ठरल्याने मीरा-भार्इंदरमध्ये बांधकामबंदी लागू करण्याचा आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने ३ फेब्रुवारीला दिला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. कचरा प्रक्रियेच्या प्रकल्पाचे कार्यादेश महिनाभरात द्या, त्यासाठी २० कोटींचा पहिला हप्ता दोन आठवड्यात कोकण आयुक्तांच्या एस्क्रो खात्यात भरा. त्यानंतरही पालिका प्रकल्प उभारू शकली नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकर घेऊन प्रक्लप राबवावा, असे आदेश दिल्याने पालिकेची पुरती कोंडी झाली आहे. तयार असलेल्या वास्तुंचे भोगवटा प्रमाणपत्रसुद्धा रोखून धरले जाईल, असे या आदेशात म्हटले आहे. त्यावर मंगळवारी, ७ तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे. मीरा-भार्इंदर पालिकेला सरकारने उत्तन येथे घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी धावगी डोंगरावर फुकट भूखंड दिला होता. तेथे अतिक्रमणे होत असूनही पालिकेने त्याकडे कानाडोळा केला. शहरातील कचरा प्रक्रिया न करताच येथे टाकला जात असल्याने हा निसर्गरम्य परिसर प्रदूषित झाला. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला. शेतजमीन नापिक झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलने व तक्रारी केल्या. पालिकेने सकवार येथे प्रकल्प उभारणीसाठी सरकारकडे पैसे भरुन जागा घेतली. पण प्रत्यक्षात काहीच न केल्याने नागरी हक्क संघर्ष समिती आणि सनी गाडेकर यांनी उत्तन डम्पिंग ग्राऊन्डविरोधात हरीत लवादाकडे धाव घेतली. २१ जुलै २०१५ मध्ये लवादाने पालिकेला चार आठवड्यात प्रकल्पासाठी ७० कोटी रुपये भरण्याचे आणि उत्तन येथे साचलेल्या व रोज निर्माण होणारया कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सुरु करण्याचे आदेश दिले. त्याविरोधात पालिका उच्च न्यायालयात गेली. तेथे आयोगाच्या आदेशाला स्थगिती मिळाली. उच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण घेऊन ७० कोटी भरा, असे लवादाने २७ आॅक्टोबर रोजी पुन्हा सांगताच न्यायालयाने ७ डिसेंबरला लवादाकडील सुनावणीला स्थगिती दिली. तोवर पालिकेने वेळकाढूपणा करत ना कचऱ्यावर प्रक्रिया केली, ना रोजच्या कचऱ्याची विल्हेवाट लावली. आयआयटीसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांनाही केराची टोपली दाखवली. पालिकेने सुरवातीलाच लवादाला १८ महिन्यात सकवार येथे घनचकरा प्रकल्प उभारण्याचे आश्वासन दिले होते. पण फुटकळ कारणे पुढे केली गेली. ओला व सुका कचरा वेगळा करण्यात पालिका अपयशी ठरली. शिवाय औद्योगिक कचऱ्यासाठीही पर्याय निर्माण केला नाही. त्यामुळे उत्तनच्या डम्पिंगला सातत्याने आगी लागून परिसर आणखी प्रदूषित होऊ लागला. गेल्यावर्षी २१ सप्टेंबरला लवादापुढील सुनावणीवरील बंदी न्यायालयाने उठवली. पण ७० कोटी भरण्यावरील स्थगिती ३० नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवत पालिकेला सर्वोच्च न्यायालय किंवा लवादाकडे जा, असे सांगत याचिका निकाली काढली.लवादाकडे सुनावणी सुरु होताच त्यांनी पुन्हा प्रकल्पासाठी ७० कोटी जमा करण्याचे निर्देश दिले. कचरा प्रकल्पाबाबत ७ तारखेच्या सुनावणीत पालिकेला तपशील सादर करावा लागणार आहे. नागरी संघर्ष समिती व सनी गाडेकर यांच्या वतीने अ‍ॅड. सुनील दिघे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)