शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी ठाण्यात कोरोना रुग्णालयाची उभारणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 17:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यात ठेकेदाराच्या फायद्यासाठी कोरोना रुग्णालयाची उभारणी केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार ...

ठळक मुद्दे भाजपचा आरोप कोरोना आपत्तीमध्ये महाराष्ट्रात पाच हजार कोटींचा घोटाळा?

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यात ठेकेदाराच्या फायद्यासाठी कोरोना रुग्णालयाची उभारणी केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. सध्या ठाण्यात एक हजार ६२० बेड रिकामे आहेत. तरीही आणखी तीन हजार १४४ बेडचे रुग्णालयाच्या उभारणीबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कोरोना आपत्तीच्या काळात उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रात पाच हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला आहे.ठाणे शहरातील कोरोना रु ग्णांसाठी उभारण्यात येत असलेल्या व्होल्टास, बोरिवडे आणि बाळकूम येथील रु ग्णालयाला सोमय्या यांनी आमदार निरंजन डावखरे आणि महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्यासह भेट दिली. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. ठाणे महापालिकेच्या बाळकूम, कळवा आणि मुंब्रा येथील रुग्णालयाच्या बेडची क्षमता एक हजार ८७५ असून तिथे अवघे २५२ रु ग्ण आहेत. सध्या एक हजार ६२० जागा रिक्त आहेत. बुश कंपनीतील ४४० आणि बोरिवडे येथील ३०४ रु ग्णक्षमतेचे केंद्र उद्घाटनानंतर रु ग्ण नसल्याने सुरू झालेच नाही. तर ज्युपीटर हॉस्पिटलनजीकच्या पार्र्किं ग प्लाझामधील एक हजार ३०० बेडचे रुग्णालय तयार झाले आहे. मात्र, व्होल्टासच्या जागेवरील आणखी एक हजार बेडच्या रु ग्णालयाचे काम सुरू केले आहे. महापालिकेच्या रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही बेड रिकामे आहेत. सध्याच्याच रुग्णालयात क्षमतेएवढे रु ग्ण नसताना नव्या रुग्णालयाचा घाट केवळ ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी केला जात आहे, असा आरोपही भाजपने केला. या माध्यमातून राज्य सरकार आणि महापालिकेकडील कोट्यवधी रुपयांची लूट केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ठाण्यात उभारलेले रुग्णालय आणि सेंटरच्या व्यवस्थापनाची कंत्राटे चेंबूर येथील एकाच कंपनीला मिळाली. या कंपनीबरोबर केलेल्या करारात रु ग्ण नसतानाही २५ टक्के रक्कम देण्याची हमी दिली. त्यामुळे कंत्राटदाराच्या तिजोरीत काम न करताच आयता पैसा जमा होणार आहे. हा चमत्कार केवळ ठाणे महापालिका व महाविकास आघाडी सरकारच करू शकते, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.* कोरोना आपत्तीच्या काळात ठाकरे सरकारने महाराष्ट्रात सुमारे पाच हजार कोटींचा घोटाळा केला. या विषयावर भाजपातर्फे लवकरच काळी पत्रिका काढली जाईल, असेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्य