शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
4
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
5
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
6
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
7
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
8
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
9
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
10
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
11
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
12
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
13
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
14
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
15
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
16
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
17
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
18
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
19
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

बांधकाम व्यावसायिक बाप-लेकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेची बनावट बांधकाम परवानगीसह असेसमेंट नोटीस आणि मूळ जमीन मालक यांचे बनावट कुलमुखत्यारपत्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेची बनावट बांधकाम परवानगीसह असेसमेंट नोटीस आणि मूळ जमीन मालक यांचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून इमारतीमधील २४ दुकाने आणि ३४ सदनिकांच्या मूळ मालकांना अंधारात ठेवले आणि त्यानंतर ते पाच कोटी रुपयात विक्री करणाऱ्या बाप-लेकाच्या जोडीला शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दीड वर्षानंतर अटक केली आहे.

किशोर रतिलाल सूचक, कुणाल सूचक अशी अटक केलेल्या बाप-लेकांची नावे आहेत, तर भरत सूचक हा मुख्य आरोपी अजूनही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे. भरत सूचक हा भिवंडीतील नजराणा कंपाऊंड परिसरात राहणारा आहे, तर अटक आरोपी बांधकाम व्यावसायिक ठाण्यात राहतात. भिवंडीतील इद्रिस अब्दुल हमीद शेख (वय ४० ) यांची वडिलोपार्जित जमीन भिवंडीतील टेमघर-पाईपलाईन भागात मुख्य रस्त्यावर आहे. ही जमीन इद्रिसच्या वडिलांनी बांधकाम विकासक भरत सूचक यास भागीदारी करार करून दिली होती. मात्र, इमारत उभारतांना २००१ साली मूळ मालकाला डावलून बांधकाम सुरू केले. तसेच पूर्वीच्या चाळीतील भाडेकरूंनाही डावलल्याने १३ नोव्हेंबर २००१ रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. तरीही मुख्य आरोपी भरत सूचक आणि दोघा आरोपी बाप-लेकांनी आपसात संगनमत करून मूळ जमीन मालकांच्या नावाने बनावट कुलमुखत्र्यातर पत्र, साठेकरार करून त्यावर बनावट सह्या केल्याचे निष्पन्न झाले होते.

या दरम्यान, आरोपींनी दोन मजली आणि त्यांनतर आणखी एक मजला अशी तीन मजली इमारत पालिकेची बनावट परवानगी व इतर इतर कागदपत्र तयार करून उभारली आहे. यामुळे जमीन मालक इद्रिस यांनी २००९ साली लोकआयुक्तांकडे धाव घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत लेखी पुरावे सादर केले. यावर सुनावणी होऊन इमारत उभारताना बनावट कागदपत्रे सादर केल्याने गुरुदेव निवासी इमारत जमीनदोस्त करावी म्हणून पालिकेला निर्देश दिले. मात्र, या विरोधात आरोपींनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनतर २७ जून २०१९ रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यामुळे आरोपींनी अंतरिम जामीनसाठी अर्जदेखील केला होता; मात्र ८ ऑगस्ट २०१९ रोजी जिल्हा सत्र न्यायालय ठाणे यांनी आरोपीचा अंतरिम जामीन रद्द केला होता.

जामीन रद्द झाल्यानंतरही या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी तक्रादार इद्रिस यांनी वारंवार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार दिल्या होत्या. अखेर दीड वर्षानी या गुन्ह्यातील दोन आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे, तर मुख्य आरोपी भरत सूचक हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.