शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महापालिकेचा ऑक्सीजन जनरेशन प्लांटची उभारणी कागदावर; पाच कोटीचा निधी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 17:55 IST

देशात व राज्यात कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाच्या दुसऱ्या लाटेत लाखो रुग्णांना लागण झाली .

- नितिन पंडीत

भिवंडी- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजन कमतरतेमुळे अनेक रुग्ण व्याकुळ असतानाच ऑक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यु  देखील झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा सामना करताना राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी सक्षम असाव्यात या उद्देशाने कोट्यवधी रुपयांचा निधी शासन देत असताना भिवंडी महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आज पर्यंत निधी असूनही ऑक्सीजन जनरेशन प्लँट उभे करू शकले नसल्याने पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्या बाबत गंभीर नसल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य अरुण राऊत यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना लेखी तक्रारद्वारे केला आहे.

देशात व राज्यात कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाच्या दुसऱ्या लाटेत लाखो रुग्णांना लागण झाली . या परिस्थितीत महाराष्ट्र राज्यासह ठाणे जिल्हा व भिवंडी शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा नाहक बळी जात होते. ऑक्सिजन अभावी रुग्णाना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने सदर रुग्णाच्या प्रकृती खालावत जात असल्याने मृत्युचे प्रमाण वाढत गेल्याचे स्पष्ट झाले होते. अशा परिस्थितीत ऑक्सीजन अभावी एक ही रुग्णांचा मृत्यू होऊ नये या करीता शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना ऑक्सीजन स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार भिवंडी महापालिकेला ऑक्सिजन जनरेशन प्लांटसाठी राज्य शासनाकडून तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी २९ एप्रिल रोजी पालिके कडे हस्तांतरीत झाला आहे. 

निधी प्राप्त झाल्यानंतर मनपा आयुक्तांनी खुदाबक्ष कोविड सेंटर त्या सोबत वऱ्हाळ देवी मंगल कार्यालय, प्रेमाताई पाटील हॉल या ठिकाणी ऑक्सीजन जनरेशन प्लांट उभारण्यास मान्यता दिली. खुदाबक्ष हॉल या ठिकाणी ९६० आईएमपी ५६.६ सीयू.एम प्रती तास चे ऑक्सीजन जनरेशन प्लँट उभारणी साठी एक कोटी ५६ लाख ८० हजार रुपयांचा ठेका मे. टेक्नामेटे इंटरप्रायझेस या कंपनीस दिला .परंतु आज पर्यंत फक्त त्या ठिकाणी काँक्रीट जोता बनवून ठेवला असून त्यावर प्लँट उभा करून देण्याची मुदत ४५ दिवसांची होती. हि मुदत संपून गेली असतानाही पालिका प्रशासनाने या बाबत कोणतेही गांभीर्य बाळगले नसल्याने भविष्यात कोरोनाची तिसरी लाट उसळल्यास त्याचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन तयारीत नसल्याने त्याचा फटका पुन्हा एकदा शहरवासीयांना बसू शकतो . अशी भीती भिवंडी मनपाचे स्थायी समिती सदस्य अरुण राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सदरचा ऑक्सीजन जनरेशन प्लांट लवकरात लवकर कार्यान्वीत करावा अशी मागणी केली आहे .