शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरण, निपुंगेंची आता उच्च न्यायालयात धाव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:09 IST

ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांनी आता मुंबई उच्च न्यायायालत धाव घेतली आहे.

- जितेंद्र कालेकरठाणे - ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांनी आता मुंबई उच्च न्यायायालत धाव घेतली आहे. आपल्याला या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.निपुंगेंचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी अलिकडेच फेटाळला. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाईल, अशी शक्यता पोलीस वर्तुळात वर्तविण्यात येत होती. जुलै २०१७ पासून त्यांनी महिला कॉन्स्टेबल सुभद्रा हिचा केलेला छळ, तिला केलेले वारंवार फोन अशा सर्व बाबी विचारात घेऊन ठाणे न्यायालयाने त्यांचा हा अटकपूर्व जामीन फेटाळला. मात्र,या प्रकरणाशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसून तपास पथकाला सर्वप्रकारे सहकार्य करण्याची पूर्ण तयारी असल्याचे कारण देऊन मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी आता अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. मंगळवारी याच प्रकरणाच्या कागदपत्रांची तसेच तपास अहवालाची मागणी उच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांकडे केली. त्यानुसार तपास पथकाने याबाबतची सर्व माहिती उच्च न्यायालयाकडे सादर केली असून लवकरच याबाबतच्या सुनावणीची तारीख जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, या प्रकरणातील अन्य एक सहआरोपी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल तथा सुभद्राचा भावी पती अमोल फापाळे याला २२ दिवसांच्या चौकशीअंती २७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली. तर गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजे ६ सप्टेंबरपासून एसीपी निपुंगे हे मात्र वैद्यकीय कारण देऊन दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यांच्या नाशिक आणि पुण्याच्या घरीही पोलीसांची दोन पथके गेली होती. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा अद्याप लागलेला नसून त्यांचा फोनही नॉटरिचेबल येत असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयthaneठाणेCrimeगुन्हा